वडले येथील युवक अतुल लाळगे यांची पुणे येथे आत्महत्या प्रकरण
आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी आज ग्रामस्थांकडून कॅन्डल मार्च आयोजन
फलटण: पुणे येथील निवारागृहातील कर्मचारी अतुल अंकुश लाळगे,(वय २७, रा. वडले, ता. फलटण, जि. सातारा) याने २२जून रोजी केलेल्या आत्महत्येचे कारण पुढे आले.अतुलला न्याय मिळालाच पाहिजे.
ग्रामस्थ व नातेवाईकांकडून संस्थाचालकांवरती आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोप खालील प्रमाणे:
*अतुल काम करत असलेले ठिकाण:-साई सेवाभावी संस्था, संचलित खुले निवारागृह, सिद्धीविनायक कॉलनी, गंगानगर, फुरसुंगी),संस्थाचालक बालाजी मुस्कवाड*
*१)खुले निवारागृहात कर्मचारी न नेमता एकट्या सोशल वर्कर असलेल्या तरुणाकडून संस्थेची व संस्थाचालकांची वैयक्तिक कामे करायला लावून मानसिक त्रास दिल्याने नैराश्यातून सोशल वर्कर असलेल्या तरुणाने गळफास घेऊन आपले जीवन संपविले. फुरसुंगी पोलिसांनी संस्थाचालक बालाजी मुस्कवाड यावर गुन्हा दाखल केला आहे.*
*२)अतुल लाळगे याला कामाच्या ठिकाणी संस्थाचालक बालाजी मुस्कवाड हे कमी पगारावर ठेवून जास्त काम करवुन घेत होते.*
*३)संस्थेत ८ कामगारांची आवश्यकता असताना केवळ एक स्वयंपाकी व एक पार्ट टाईम कामगार ठेवून सर्व कामे अतुल करुन करवुन घेत होते.*
*४)संस्थेमधून मुले पळून गेल्यानंतर इतर कोणाची चुक झाली तरी अतुल याचीच चुक मानली जाऊ लागली.*
*५)गेल्या अडीच वर्षात तेथे राहणार्या सर्व बालकांचे, संस्थेचे इतर काम, संस्था प्रमुखांच्या दुसर्या संस्थेचे पत्रांचे काम व त्यांचे वैयक्तिक कामे, घरगुती कामे, मुलांची असायंन्मेंट व डबे पोहचविणे अशी सर्व कामे त्याला करायला लावत होते. तसेच त्यांच्या नातेवाईकांची कामे करावी लागत होते.*
*६)सुरुवातीला सोशल वर्कर या पदावर कामाला ठेवले असताना त्याला कामाचा अनुभव नसताना कोऑर्डीनेटर म्हणून काम करायला लावले.*
*७)संस्थेतील इतर कामगारांच्या पासून निघून गेलेल्या मुलांबाबत सुद्धा त्याला जबाबदार धरुन बालाजी मस्कवाड त्याला मानसिक त्रास देत असे.*
*८)संस्थेतील सर्व रजिस्टर आणि माहिती मुल्य निर्धारणसाठी सतत ४ महिन्यात बदलली जाते. त्याचा त्रास त्याला दिला जात असे.*
*९)काही दिवसांपूर्वी राजन नावाच्या मुलाचा मृत्यु झाला. अतुल याने सर्व काळजी घेऊन त्याला वेळेवर उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतरही त्याचा मृत्यु झाला. इतकी सर्व कामे केल्यानंतरही त्याला केवळ १५ हजार रुपये पगार दिला जात होता. तोही वेळेवर देत नसे.*
१०)त्याने काम सोडायचे म्हटले तरी इतर लोकांच्या कामाच्या चुकीमुळे व मुले निघून गेले याची सर्व जबाबदारी अतुल याची असल्याचे सांगून केस करुन बरबाद करु, अशी धमकी बालाजी मुस्कवाड वारंवार देत होता. त्यामुळे तो नैराश्येमध्ये गेला. त्यातून त्याने गळफास घेऊन आपले आयुष्य संपविले आहे.









