फलटण ग्रामीण पोलीसांची गांजा लागवडीवर गुणवरे गावात कारवाई
फलटण: मा. पोलीस अधिक्षक निखील पिंगळे सो व अप्पर पोलीस अधिक्षक सो मा. वैशाली कडुकर सो यांच्या मार्गदर्शनाखाली अवैदय धंदयाबाबत कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत दि.२५/०६/२०२६ रोजी मौजे गुणवरे ता. फलटण जि.सातारा गावामध्ये एका घराच्या बाजुला गांजाच्या झाडाची लागवड केली असल्याची गोपणीय बातमी मिळाली. बातमी मिळाल्यानंतर मिळालेल्या बाततीच्या आधारे सपोनि सुबनावळ यांच्या पथकाने मौजे गुणवरे ता. फलटण येथिल घुलेवस्ती येथे छापा टाकला असता सदर ठिकाणी ३४,६५० /-रुपये किंमतीचे ७ किलो १४३ ग्रॅम वजानाची गांजाची झाडे मिळुन आली असुन सदरबाबत अंकुश रामचंद्र कोळेकर रा. गुणवरे ता. फलटण जि. सातारा यांचेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक निखील पिंगळे सो व अप्पर पोलीस अधिक्षक सो मा. वैशाली कडुकर सो. मा. धन्यकुमार गोडसे सो. उपविभागीय पोलीस अधिकारी सो. फलटण यांच्या सुचनानुसार राजकुमार भुजबळ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत सुबनावळ सहा. पोलीस निरीक्षक, शिवानी नागवडे पोलीस उपनिरीक्षक, संतोष मठपती पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवा. शांलीलाल ओंबासे, योगेश रणपिसे, पोना. सागर अभंग, पोकॉ. तुषार नलवडे, पोकॉ. अमोल देशमुख, पोकॉ. अविनाश शिंदे यांनी या कारवाईमध्ये भाग घेतला.









