राजाळे येथे 22 व्या शिवसेना शाखा कार्यालयाचे थाटात उद्घाटन! ‘शाखेच्या माध्यमातून सर्व सामन्यांची कामे होतील’ – श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर 


राजाळे येथे 22 व्या शिवसेना शाखा कार्यालयाचे थाटात उद्घाटन!

‘शाखेच्या माध्यमातून सर्व सामन्यांची कामे होतील’ – श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

 

 

फलटण: राजाळे ता.फलटण येथे शिवसेना शाखा कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.

 

प्रमुख पाहुणे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे हस्ते फित कापून शाखा कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.तसेच मान्यवरांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

 

यावेळी बोलताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले की शिवसेना शाखा कार्यालयाचे माध्यमातून गावातील सर्वसामान्य जनतेची कामे मोठ्या ताकतीने होतील. तसेच त्यांनी शिवसेना शाखा पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा.आमदार दीपक चव्हाण, फलटण पंचायत समितीचे उपसभापती अमोल सस्ते, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब शेंडे, जिल्हा परिषद सदस्य सौ.ज्योती मोरे, पंचायत समिती सदस्या सौ.पुष्पा चोपडे, शिवसेना तालुकाप्रमुख नानासो (पिंटू) इवरे, शिवसेना नेते विराज खराडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पोपटराव बुरुंगले, श्रीराम सहकारी साखर कारखाना संचालक पोपटराव जाधव,सुखदेव बेलदार, पंचायत समितीचे माजी सभापती दत्तात्रय गुंजवटे, राजाळे गावचे मा.सरपंच संभाजीबापू निंबाळकर,युवा नेते विनोद शेडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

शिवसेना राजाळे शाखेचे प्रमुख विजयसिंह निंबाळकर, उपशाखाप्रमुख धनाजी जाधव, सचिव किशोर पांढरे,सरचिटणीस निलेश भोईटे, खजिनदार देविदास शेडगे यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

 

कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य हनुमंत गुरव, सुरेखा शिवाजी बुधावले, रामभाऊ निंबाळकर तसेच संदीपदादा पवार, महावीर भालेराव,अजितराव निंबाळकर,निखिल निंबाळकर, चंद्रकांत शेडगे, संदीप भोईटे,किरण निंबाळकर,शंकर भांडवलकर, नितीन निंबाळकर, नितीन शेडगे, मनोज धुमाळ, सुरेश गोडसे व ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.राजश्री शिंदे मॅडम यांनी केले.


मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

35
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

error: Content is protected !!