बडेखान-साखरवाडी रस्त्याची चाळण , बांधकाम विभाग गांधारीच्या भूमिकेत!

बडेखान-साखरवाडी रस्त्याची चाळण,

सार्वजनिक बांधकाम विभाग गांधारीच्या भूमिकेत!

रस्त्याच्या दुरुस्तीची नागरिकांकडून मागणी; अन्यथा आंदोलनाचा इशारा

फलटण प्रतिनिधी:२४:ता. बडेखान-साखरवाडी या रस्त्यावरून साखरवाडी येथील साखर कारखान्याचे ऊस वाहतूक खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. दिवसभरात शेकडो ऊस वाहतूक ट्रॅक्टर ट्रॉलीज, व अन्य वाहने या रस्त्यावरून वाहतूक करत असतात. त्यामुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. खुप मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे पडले आहेत व रोडच्या साईड पट्ट्या सुद्धा खूप खचलेल्या आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जीव मुठीत घेऊन व खूप भयभीत होऊन प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना या अगोदर अनेक जणांना जीव गमवावा लागला आहे. तसेच ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर ट्रॉलीज या रस्त्यावर पलटी होत आहेत. त्यामुळे अजुन एखादा निष्पाप जीव जाऊ शकतो.

तसेच या रस्त्यावरून नांदल, घाडगेमळा, काळज, तडवळे, खराडेवाडी येथील शाळेत जाणारी मुले, शेतकरी, एमआयडीसी मध्ये कामाला जाणारे कर्मचारी प्रवास करत असतात. तसेच या रस्त्यावरून अनेक प्रवासी बारामती, लोणंद, फलटण, पुणे, सातारा ला जाण्यासाठी सुद्धा प्रवास करत असतात.

साखरवाडी येथे कारखाना चालू असल्यामुळे या कारखान्याच्या अवजड वाहनांची वाहतूक याच रस्त्यावरून होत असते. आणि हा रस्ता सिंगल वाहतुकीचा असल्यामुळे समोरून आलेल्या गाडीला जाण्यासाठी रस्ता पुरत नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे प्रशासनाने रस्त्यावरील खचलेल्या साईड पट्ट्या मुरुमाने लवकरात लवकर भरून घ्याव्यात व रस्त्याची व्यवस्थित लेवल करून दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून व प्रवाशांकडून केली जात आहे.

तसेच या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने लवकरात लवकर चालू करावे अशी मागणी साखरवाडी, खामगाव, मुरूम, खराडेवाडी, तडवळे, काळज, नांदल, घाडगे मळा येथील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कर्मचारी, विद्यार्थी यांच्यावतीने करण्यात येत आहे.

या मागणीची दखल जर प्रशासनाने घेतली नाही तर वरील सर्व गावातील नागरिक व प्रवासी यांच्याकडून बडेखान येथे रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

22
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

error: Content is protected !!