बरड येथे महिला सुरक्षा व जाणीव जागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न 

बरड येथे महिला सुरक्षा व जाणीव जागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

फलटण :दि.25  फलटण तालुक्यातील बरड (लोंढेवस्ती–झिरपवस्ती) येथे महिला सुरक्षा व जाणीव जागृती कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला.

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केवळ कायदे पुरेसे नसून समाजाच्या मानसिकतेत बदल होणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रमुख वक्ते सामाजिक कार्यकर्ते अशोक भोसले यांनी व्यक्त केले.

नवयान संशोधन उन्नती आणि शिक्षण-प्रशिक्षण संस्था बरड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमात परिसरातील महिला व युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

कार्यक्रमादरम्यान महिलांवरील अत्याचार, त्याविरोधातील कायदे तसेच महिलांचे मूलभूत हक्क याबाबत सखोल व मार्गदर्शक माहिती देण्यात आली.

यावेळी वक्त्यांनी कौटुंबिक हिंसाचार कायदा तसेच कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाविरोधातील कायदे यांची सविस्तर माहिती दिली. महिलांनी आपल्या हक्कांची जाणीव ठेवून अन्यायाविरोधात ठामपणे उभे राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

महिला व युवती आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजेत, यावर विशेष भर देत बचत गटांच्या माध्यमातून घेतलेल्या कर्जाचा योग्य वापर करून मुलांना चांगले व उच्च शिक्षण द्यावे, असा सल्ला त्यांनी दिला. तसेच स्त्री–पुरुष समानतेविषयी मार्गदर्शन करताना कुटुंबात पुरुष जितका महत्त्वाचा घटक आहे, तितकीच स्त्रीही महत्त्वाची आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

स्त्रीने मानसिक गुलामगिरी झुगारून दिल्यास संपूर्ण कुटुंबाचा कायापालट होण्यास वेळ लागत नाही. घरातूनच अपशब्दांचा वापर बंद करून सामाजिक सुसंस्कार रुजवले पाहिजेत, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

22
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

error: Content is protected !!