भारती विद्यापीठ इंग्रजी परीक्षेत फलटणच्या ‘श्रीराम विद्याभवन’ची अनया पवार राज्यात प्रथम अनया पवारने शाळेचे नाव राज्य पातळीवर नेले; तिचे यश अभिमानास्पद : रविंद्र बेडकिहाळ

भारती विद्यापीठ इंग्रजी परीक्षेत फलटणच्या ‘श्रीराम विद्याभवन’ची अनया पवार राज्यात प्रथम

अनया पवारने शाळेचे नाव राज्य पातळीवर नेले; तिचे यश अभिमानास्पद : रविंद्र बेडकिहाळ

आसू,ता.9 : भारती विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या इंग्रजी विषयाच्या प्राथमिक (प्रायमरी) परीक्षेत महात्मा एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीराम विद्याभवन प्राथमिक शाळेतील विदयार्थीनी

अनया किशोर पवार हिने राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे.या यशाबद्दल संस्थेच्या वतीने तिचे आणि अन्य यशस्वी विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार भारती विद्यापीठाचे आजीव सदस्य रविंद्र बेडकिहाळ व भारती विद्यापीठ खारघर (मुंबई) येथील नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या वैशालीताई जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी अनयाला रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

भारती विद्यापीठाच्या आगामी बैठकी दरम्यान अनया पवार हिचा पुणे येथे स्वतंत्र आणि विशेष सत्कार करण्यात येईल.अशा यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही शिक्षणात उत्कृष्ट कामगिरी करण्याची प्रेरणा मिळेल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.अनया पवार हिने संस्थेचे नाव राज्य पातळीवर नेले आहे,ही बाब आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे,असे गौरवोद्गार सेक्रेटरी रविंद्र बेडकिहाळ यांनी काढले.

शिक्षणाचे महत्त्व ओळखून डॉ. पतंगराव कदम यांनी 1964 मध्ये प्रतिकूल परिस्थितीत भारती विद्यापीठाची स्थापना केली. आज या संस्थेला 62 वर्षे पूर्ण होत आहेत. ग्रामीण भागातील मुले इंग्रजी-गणित विषयात मागे राहू नयेत, हा त्यांचा दूरदृष्टीकोन अनयासारख्या विद्यार्थ्यांनी सार्थ ठरवला आहे. त्यांनी पुढे सल्ला दिला की, आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी विद्यार्थ्यांनी त्यावर मार्ग शोधून पुढे जाणे गरजेचे आहे, कारण अडचणीच आपल्याला सक्षम बनवतात.अभ्यासात सातत्य आणि सराव ठेवल्यास अपेक्षित यश नक्कीच मिळते असे प्राचार्या वैशालीताई जाधव यांनी सांगितले.

प्रारंभी विशेष प्राविण्य मिळवल्याबद्दल श्रेयश संकपाळ, भूमी गायकवाड, श्रावणी अहिवळे, आस्था विश्‍वकर्मा, ध्रुव कळंबे, राजवीर मोरे, अवनी जाधव आणि यलुबाई जाधव या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी शाळा समितीचे अध्यक्ष रविंद्र बर्गे, आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालय समितीच्या अध्यक्षा अलका बेडकिहाळ,प्रशालेचे मुख्याध्यापक मनीष निंबाळकर,आणि माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक भिवा जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्याध्यापक मनीष निंबाळकर यांनी स्वागत केले,तर सूत्रसंचालन किशोर पवार यांनी केले.यावेळी शिक्षक,पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

फोटो:फलटण : अनया पवार हिचा सत्कार करताना रविंद्र बेडकिहाळ,रविंद्र बर्गे,वैशालीताई जाधव,अलका बेडकिहाळ,मनीष निंबाळकर, भिवा जगताप आणि इतर

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!