राज्यस्तरीय महिला कब्बडी स्पर्धा दहिवडी येथे उत्साहात संपन्न

राज्यस्तरीय महिला कब्बडी स्पर्धा दहिवडी येथे उत्साहात संपन्न

प्रतिनिधी:-(जुबेरभाई कोतवाल): मर्दानी खेळ हि पुरुषांची मक्तेदारी आहे हा समज मोडीत काडीत सर्वसामान्य गृहिणी व एकल महिलांनी कब्बडीचा मनसोक्त आनंद लुटला.कोरो इंडिया,समता महिला संघटना व समय फॉउंडेशन च्या वतीने एकल,ट्रान्स महिला व युवतीसाठी दहिवडी येथील शासकीय क्रीडा संकुलात राज्यस्तरीय कब्बडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.माण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे यांचे हस्ते दीप प्रज्वलन करून स्पर्धेची सुरवात करण्यात आली.

हार,जीत पेक्षा शालेय जीवनानंतर प्रथमच कब्बडी खेळण्याची संधी मिळाली हेच आमच्या दृष्टीने महत्वाचे आहे अशा भावना सहभागी महिला खेळाडू यांनी व्यक्त केल्या.18 वर्षांच्या युवतीपासून 60 वर्षाच्या आजीपर्यंत महिलांचा या स्पर्धेमध्ये सहभाग राहिला

अमच्युअर कब्बडी फॉउंडेशन महाराष्ट्र चे राज्य सचिव व क्रीडाशिक्षक ज्ञानेश्वर काळे सर व त्यांच्या टीमने ग्राउंड आखण्यापासून ते पंच म्हणून मोलाची कामगिरी बजावली.

सातारा,सांगली,सोलापूर येथील 18 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते यातील प्रथम क्रमांकाचे बक्षीस कै.मधुराणी थोरात यांचे स्मरणार्थ,5000 रुपये व ट्रॉफी सखी संघ कासारवाडी यांनी व द्वितीय क्रमांकाचे बक्षीस 3000 रुपये ट्रॉफी तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस कै.हणमंत बारबोले यांच्या स्मरणार्थ 2000 रुपये व ट्रॉफी राजमाता जिजाऊ संघ कुळकजाई यांनी पटकविले तर बेस्ट डिफेन्डर म्हणून मयुरी नाळे,बेस्ट रायडर उषा गोरे तर आलराउंडर म्हणून आदिती साळुंखे यांना सन्मानित करण्यात आले.

ज्ञानदीप संस्थेचे अध्यक्ष आनंदा थोरात,ज्ञानेश्वर काळे सर,पत्रकार रुपेश कदम,कोरोच्या विनया घेवदे,डी एस स्पोर्टचे दीपक सजगने यांचे हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरित करण्यात आले.

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

22
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

error: Content is protected !!