बरड जिल्हा परिषद गटाचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार गंगाराम रणदिवे यांच्या प्रचाराचा नारळ फुटला
फलटण: बरड जिल्हा परिषद गट अंतर्गत आज दि. 25/01/2026 रोजी मुंजवडी येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार गंगाराम अरुण रणदिवे यांच्या प्रचाराचा नारळ शुभारंभ फलटण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री महेंद्रभैय्या सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), फलटण नगरपरिषद फलटणचे नगरसेवक श्री.पंकज चंद्रकांत पवार, सेवा दलाचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष श्री राजेंद्र अच्युतराव खलाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला
यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तसेच बरड जिल्हा परिषद गटातील मतदार बंधू भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते. उमेदवाराच्या प्रचाराला सुरुवात झाली असून गटातील प्रत्येक गावात जाऊन पक्षाची भूमिका व विचार पोहोचवणार असल्याचे गंगाराम रणदिवे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.









