संत तुकाराम महाराज बीज यात्रेनिमित्त वडूज येथील बनपुरी गावात गौतमी पाटीलचा लावणी कार्यक्रम! सामजिक कार्यकर्त्या प्रतिभाताई शेलार यांच्या पाठपुराव्यामुळे कार्यक्रम रद्द!

संत तुकाराम महाराज बीज यात्रेनिमित्त वडूज येथील बनपुरी गावात गौतमी पाटीलचा लावणी कार्यक्रम!

सामजिक कार्यकर्त्या प्रतिभाताई शेलार यांच्या पाठपुराव्यामुळे कार्यक्रम रद्द!

सातारा: साताऱ्यातील वडूज पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बनपुरी गावात संत तुकाराम बीज यात्रेनिमित्त गौतमी पाटील हिच्या कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता तो सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शेलार यांच्या निवेदनाची दखल घेवुन रद्द करण्यात आला आहे.

सातारा वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री .घनश्याम सोनवणे सरांना मी फोन करून व व्हाट्सअप द्वारे या गोष्टीची कल्पना देण्यात आली होती. की हा कार्यक्रम रद्द करावा किंवा या कार्यक्रमाचे आयोजक ,संयोजक आणि गौतमी पाटील हिला नोटीस बजवावी की जेणेकरून या कार्यक्रमात अश्लील प्रकारचे डान्स होऊ नये.कारण संत तुकाराम महाराजांनी समाजाला आदर सदभावनांची शिकवण दिली होती. संत तुकाराम बिज यात्रेमध्ये असले कार्यक्रम चालणार नाहीत

असे कार्यक्रम झालेत तर कार्यक्रमाला अशा गोष्टींमुळे गालबोट लागते आणि समाज तर बिघडतोच, सर्वात महत्त्वाचे म्हणजे येणारे प्रेक्षक, युवा पिढी व पुरुष वर्ग व वारकरी संप्रदाय आणि समाजात असणाऱ्या महिलांची भावना जपणे महत्त्वाचे.

या अनुषंगाने सातारा वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.सोमनाथ सोनावणे सरांनी आमच्या निवेदनाची दखल घेऊन, वारकरी संप्रदाय यांच्या भावनांचा व महिलांच्या भावनांचा विचार करून हा कार्यक्रम रद्द करावा व ग्रामस्थांना व संयोजक, आयोजक यांना नोटीस बजावावी असे सांगण्यात आली होते . त्या अनुषंगाने सातारा वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सोमनाथ सोनवणे सरांनी ग्रामस्थ व संयोजक आयोजक यांना नोटीस बजावली व कार्यक्रम रद्द करावा असे सांगितले. त्या अनुषंगाने गावातील ग्रामस्थ व संयोजक आयोजक यांनी आज होणारा गौतम पाटील हिचा नृत्याचा कार्यक्रम तात्काळ रद्द केला आहे.

“त्यामुळे सातारा वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोमनाथ सोनवणे व सर्व गावकरी मंडळी यांचे मी खूप आभार मानते आणि असे अश्लीलतेचे कार्यक्रम आपल्या साताऱ्यात होऊच नये यासाठी सातारा पोलीस प्रशासन व जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी याचे भान ठेवावे आणि आपला सातारा ऐतिहासिक सातारा म्हणूनच संपूर्ण देशात नावलौकिक करावे.”- सौ.प्रतिभा सुनील शेलार संस्थापिका/ अध्यक्ष : महालक्ष्मी आधार फाउंडेशन,सातारा

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

22
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

error: Content is protected !!