गोखळी येथे नीरा नदीत अनोळखी सापडलेला मृत व्यक्ती अंकुश नरबट (ढाकणी ता.माण) यांचा खूनच! आरोपी पिंप्रद ता. फलटण येथील . दृश्यम पिक्चर मधील स्टोरी प्रमाणे घटना ! गुन्हे प्रगटीकरणचे(DB) प्रमुख पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार यांची धडाकेबाज कामगिरी!

गोखळी येथे नीरा नदीत अनोळखी सापडलेला मृत व्यक्ती अंकुश नरबट (ढाकणी ता.माण) यांचा खूनच!

आरोपी पिंप्रद ता. फलटण येथील .

दृश्यम पिक्चर मधील स्टोरी प्रमाणे घटना !

गुन्हे प्रगटीकरणचे(DB) प्रमुख पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार यांची धडाकेबाज कामगिरी

फलटण: काही दिवसांपूर्वी गोखळी ता.फलटण येथे अज्ञात मयत व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. सदर घटनेचा घटनाक्रम हा हिंदी पिक्चर दृश्यम मधील प्रमाणे स्टोरी घडलेली दिसून येत आहे. दृश्यम पिक्चर मध्ये अजय देवगन ने पोलिसांना गुंगारा दिला होता. परंतु फलटण येथील अशाच घडलेल्या घटनेमध्ये पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार यांनी खुनाचा छडा हा कमी पुरावे असताना लावून धडाकेबाज कामगिरी केलेली आहे. त्यांचे या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पोलीस उपनिरिक्षक दिपक पवार यांनी db चा चार्ज घेतल्यापासून 2 महिन्यात सस्तेवाडी येथील गणेश मदने, विडणी येथील सतीश दडस व आता गोखळी येथील अंकुश नरभट याचा मर्डर उघडकीस आणला आहे.

दि. 17/02/2026 रोजी 18.00 वा. चे सुमारास गोखळी, ता. फलटण, जि. सातारा गावचे हद्दीत निरानदीच्या पात्रात एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत पाण्यावर तरंगत असलेल्या स्थितीत ग्रामस्थांना दिसुन आल्यानंतर त्याबाबत प्रथम अकस्मात मयत नोंद करण्यात आले होते. त्याचे तपासामध्ये अनोळखी मृतदेहाची ओळख पटुन ते अंकुश बापू नरबट वय 22 वर्ष, रा. ढाकणी, ता. माण, जि. सातारा याचे असल्याचे निष्पन्न झाले.

तो माण तालुक्यातील रहिवाशी असताना त्याचा मृतदेह फलटण तालुक्यातील निरानदीच्या पात्रात कसा मिळुन आला ? याशिवाय प्रेताचे डोक्यावर असणा-या जखमा कशा? ही शंका पोलीसांना आली. त्यातच मृत हा स्त्रीलंपट असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावर पोलीस तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे मुळापर्यंत गेल्यानंतर असे निष्पन्न झाले, की मृत अंकुश बापू नरबट याने आरोपींच्या कुटूंबातील एका मुलीबाबत अत्याचाराचा प्रकार केला होता. परंतु आरोपींनी खोट्या प्रतिष्ठेपायी त्याची कोठेही वाच्यता न करता बदला घेण्यासाठी त्याचा खुन करण्याचा कट केला. त्यानुसार मृतास प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी स्त्रीच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट उघडुन मृत व्यक्तीस प्रेमाच्या जाळ्यात ओढुन फलटणला भेटायला बोलाविले.

दि. 15/02/2025 रोजी 12.00 वा. चे सुमारास मृत अंकुश नरबट हा फलटणला आल्यानंतर आरोपींपैकी एका महिलेने त्यास एकांतात वेळ घालविण्याच्या बहाण्याने निर्जनस्थळ असलेल्या तातमगिरी डोंगराच्या पायथ्याला नेले. त्याठिकाणी गेल्यानंतर कटानुसार इतर चार आरोपी हे वेगवेगळ्या वाहनातून गेले. तेथे त्यांनी मृत अंकुश नरबट यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन चारचाकी वाहनामध्ये घालुन पिंप्रद, ता. फलटण गावचे हद्दीत दुस-या निर्जनस्थळी नेले. त्याठिकाणी त्याचा खुन करुन त्याचे प्रेत पुरावा नाहीसा करण्याच्या उद्देशाने गोखळी गावचे हद्दीत निरानदीच्या पात्रात टाकुन दिले. हा प्रकार निष्पन्न झाल्यानंतर फलटण ग्रामीण पोलीस ठाणे, गु. र. नं. 119/2026, भा. न्या. सं. 2023 चे कलम 103 (1), 140(1), 238, 61, 3(5) अन्वये खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

त्याचा तपास पो. उ. नि. दिपक पवार हे करीत असुन आरोपी 1. आविष्कार ज्ञानेश्वर भगत 2. श्रद्धा आविष्कार भगत 3. ज्ञानेश्वर भरतराव भगत 4. अर्चना ज्ञानेश्वर भगत चौघे रा. पिंप्रद, ता. फलटण, जि. सातारा यांना अटक करण्यात आली आहे.

आरोपींनी सदरचा गुन्हा थंड डोक्याने कट करुन केला आहे. यामुळे तपासामध्ये सुरुवातीला पोलीसांकडे काहीही धागेदोरे नव्हते. परंतु पोलीसांनी अत्यंत मेहनतीने फलटण ते दहिवडी रोडवरील सर्व हॉटेल, दुधडेअरी व पेट्रोलपंप इत्यादी ठिकाणांवरील सी. सी. टी. व्ही. कॅमेरे तपासले. आरोपी व मृतक यांचे मोबाईल नंबरची तांत्रिक माहिती प्राप्त केली. त्यातून मिळालेल्या तुटपुंज्या माहितीच्या आधारे कौशल्यपुर्ण तपास करुन पुराव्याची साखळी जोडुन सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक तुषार दोशी ,अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांचे नेतृत्वात गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक दिपक ज्ञानदेव पवार, पोलीस अमंलदार नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, वैभव सुर्यवंशी, हणमंत दडस यांनी सहभाग घेतला होता.

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!