गोखळी येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त  विविध उपक्रम; दिव्यांगांना व्हीलचेअर वाटप


गोखळी येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त  विविध उपक्रम; दिव्यांगांना व्हीलचेअर वाटप

 

फलटण प्रतिनिधी: जागतिक दिव्यांग दिनानिमित्त प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग संघटना यांच्या वतीने मंगळवार, दिनांक ३० डिसेंबर २०२५ रोजी प्रहार जनशक्ती पक्ष कार्यालय, गोखळी येथे विविध सामाजिक व संघटनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

 

या कार्यक्रमात प्रहार जनशक्ती पक्ष कार्यालय गोखळी व फलटण कार्यालय उभारणीसाठी मोलाची मदत करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार समारंभ पार पडला. यामध्ये डॉ. संदीप गावडे, गोखळी ग्रामपंचायत माजी सदस्य अमोल हरिहर, पैलवान स्वप्नील पवार, राजेंद्र जगताप (तात्या), मयूर पवार (स्वराज फर्निचर), जिजाबा कदम, सामाजिक कार्यकर्ते शरद शिर्के तसेच मनोबल आसरा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र गावडे पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

 

तसेच जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग बांधवांना वेळोवेळी सहकार्य करणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे फलटण तालुकाध्यक्ष श्री. सागर गावडे, यांचा अध्यक्ष महेश जगताप यांच्या विनंतीने, प्रहार दिव्यांग संघटना फलटण तालुक्याच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.

 

यावेळी दिव्यांग बांधवांना रेल्वे पासचे वाटप करण्यात आले तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. मनोबल आसरा फाउंडेशन संस्थेला संघटनेतर्फे ब्लँकेट व व्हीलचेअर भेट देण्यात आली.

 

याच कार्यक्रमात प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत पक्ष व संघटना वाढ, सदस्य नोंदणी व आगामी कार्ययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

 

कार्यक्रमास पक्षाचे पदाधिकारी, संघटनेचे कार्यकर्ते, दिव्यांग बंधू-भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते


मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

35
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

error: Content is protected !!