छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती गुणवरे येथे विविध सामाजिक उपक्रमाने साजरी तथागत चॅरिटेबल ट्रस्टचे आयोजन


छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती गुणवरे येथे विविध सामाजिक उपक्रमाने साजरी

तथागत चॅरिटेबल ट्रस्टचे आयोजन

 

फलटण: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने गुणवरे ता. फलटण येथे भव्य रक्तदान शिबीर, रक्त तपासणी शिबिर, दंत चिकीत्सा शिबीर, विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

यावेळी गुणवरे पंचक्रोशितील चारशे पेक्षा ग्रामस्थांनी यामध्ये सहभाग घेतला होता.कार्यक्रमाचे आयोजन अतिशय उत्तम प्रकारे करण्यात आले होते. या प्रसंगी डॉ सौ.गुंदेचा डॉ.सौ.सोनाली बुद्धभूषण आढाव , अक्षय ब्लड बँकचे मोलाचे सह‌कार्य लाभले .

 

विविध शिबिरामध्ये सहभागी झालेल्या ग्रामस्थांना प्रमाणपत्र, व विविध भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक वक्ते प्रा. डॉ.बाळासाहेब कांबळे यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.

 

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा फलटण, गावातील विविध मंडळे, सामाजिक संघटना, शाळा, विद्यालय यांचे सहकार्य लाभले.

 

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तथागत चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी,प्रा.अभिषेक तावरे, डॉ. पलाश कांबळे, कोमल आढाव बुद्धभूषण आढाव, अरविंद आढाव रामराजे आढाव, तसेच गावातील युवा कार्यकर्ते यांचे अनमोल सहकार्य लाभले. यावेळी इयत्ता सातवीतील विद्यार्थी धम्मदी आढाव याने शिवाजी महाराजांच्या वरती उत्कृष्ट असे व्याख्यान दिले.


मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

35
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

error: Content is protected !!