गुणवरे येथे पोलिस कर्मचारी यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीस 4 दिवस पोलिस कोठडी 


गुणवरे येथे पोलिस कर्मचारी यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीस 4 दिवस पोलिस कोठडी

 

फलटण: गुणवरे येथील सतपाल गावडे या युवकाला पोलिसांवर केलेल्या हल्ला प्रकरणी न्यायालयाने चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

 

फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार,साधारण महिन्या भरापूर्वी फलटण तालुक्यातील गुणवरे येथील घुलेवस्ती परिसरात एका तक्रार अर्जाची चौकशी करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला करत, त्यांच्यासमोरच हातोड्याने स्कॉर्पिओ फोडल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. एवढेच नव्हे तर, संशयिताने पोलिसांनाही धक्काबुक्की करत त्यांच्या खाजगी वाहनाचे नुकसान केले होते.याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन पांडुरंग गावडे यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात एक तक्रार अर्ज दिला होता. या अर्जाची शहानिशा करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पोलीस नाईक सागर अभंग आणि पोलीस उपनिरीक्षक संतोष मठपती हे २४ जानेवारीला दुपारी पावणेतीनच्या सुमारास गुणवरे येथील घुलेवस्ती येथे गेले होते.

 

 

पोलीस अधिकारी व तक्रारदाराच्या उपस्थितीत सतपाल अर्जुन गावडे याला समजून सांगत होते. मात्र, संतापलेल्या सतपालने कोणाचीही तमा न बाळगता हातात हातोडा घेऊन थेट स्कॉर्पिओ फोडण्यास सुरुवात केली.

 

पोलीस उपनिरीक्षक मठपती यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने पोलिसांनाच धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने पोलीस नाईक सागर अभंग यांच्या खाजगी वाहनावरही दगडफेक करून काच फोडली आणि शासनाच्या कामात अडथळा निर्माण केला होता.

 

पोलीस नाईक सागर अभंग यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सतपाल गावडे याच्याविरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

सदर फरार आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले असून काल दिनांक 25 फेब्रुवारी रोजी आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 4 दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास फलटण ग्रामीणचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ करीत आहेत.


पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!