विडणी जिल्हा परिषद गटासाठी शिवसेनेकडून सौ.ज्योती गौतम मोरे मैदानात
फलटण: शिवसेना पक्ष राजे गटाकडून विडणी जिल्हा परिषद गटासाठी अधिकृत उमेदवार म्हणून सौ.ज्योती गौतम मोरे यांनी अर्ज दाखल केला आहे. त्या सांगवी ग्रामपंचायतच्या माजी सदस्य आहेत.त्यांच्या कार्यकाळत त्यांनी गावात विविध विकास कामे केली आहेत. त्यांचे पती गौतम मोरे यांच्या सर्वांना मदत करण्याच्या स्वभावामुळे पंचक्रोशीत त्यांचा जनसंपर्क मोठा आहे.
विडणी जिल्हा परिषद गट हा राजे गटाचा बालेकिल्ला मानला जातो.विडणी ,सांगवी,धुळदेव, माझेरी ,राजाळे ,सोनगाव सोमंथळी, पिंप्रद, टाकळवाडे, या सर्व गावांच्या सर्वांगीण विकासासाठी,जनतेच्या प्रश्नांसाठी प्रामाणिकपणे लढण्याचा उमेदवारांनी निर्धार व्यक्त केला आहे.
मा.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर मा.आ.दिपकराव चव्हाण आणि पक्ष नेतृत्वाने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले.आपला विश्वास, आशीर्वाद आणि पाठिंबा हा माझ्या लढाईची खरी ताकद आहे. आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर राहणार असल्याचे उमेदवार सौ.ज्योती गौतम मोरे यांनी मत व्यक्त केले आहे.









