सस्तेवाडी गणात सौ.ऋतुजा सागर कुंभार यांची अपक्ष उमेदवारी  सस्तेवाडी गणात तिरंगी लढतीने रंगत 

सस्तेवाडी गणात सौ.ऋतुजा सागर कुंभार यांची अपक्ष उमेदवारी 

सस्तेवाडी गणात तिरंगी लढतीने रंगत 

फलटण: खुंटे गावचे सामाजिक कार्यकर्ते श्री.सागर शिवाजी कुंभार यांच्या पत्नी सौ .ऋतुजा सागर कुंभार या पंचायत समिती गण क्रमांक १०- सस्तेवाडी ( नागरिकांचा मागास प्रवर्ग) मधुन अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.सागर शिवाजी कुंभार हे खुंटे गावच्या विकासासाठी तसेच सामाजिक क्षेत्रात नेहमीच उल्लेखनीय कामगिरी करताना दिसून आले आहेत. खुंटे गावातील पाणी पुरवठा करणारी नवीन पाण्याची टाकी बांधण्यासाठी पाठपुरावा करणे, गावच्या लोकवर्गणीतून स्मशानभूमी बांधण्यासाठी योगदान देणे, गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणे, शेतकऱ्यांना शेतीमध्ये अवकाळी पावसामुळे झालेली शासकीय नुकसान मिळवून देण्यासाठी संघर्ष करणे, गावातील सर्व सामान्य नागरिकांना शासकीय लाभ मिळवून देणे इत्यादी त्यांच्याकडून सामाजिक कार्य केली जात आहेत .

मागील खुंटे ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांचा केवळ २ मतांनी पराभव झाला गेला. परंतु त्यांनी पराभव स्वीकारुन पुन्हा सामाजिक क्षेत्रात चळवळ चालू ठेवली.त्यांचा पंचक्रोशीत मोठा जनसंपर्क आहे. सस्तेवाडी गणात खुंटे, शिंदेवाडी, भिलकटी, चौधरवाडी,कांबळेश्वर, सस्तेवाडी अलगुडेवाडी ही गावे येतात.याठिकाणी भारतीय जनता पार्टी व शिवसेनेचे उमेदवार उभे असून सौ.ऋतुजा सागर कुंभार यांच्या अपक्ष उमेदवारीने गणात मोठी चुरस निर्माण झाली आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

22
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

error: Content is protected !!