विडणी पंचायत समिती गणातून महेंद्र सूर्यवंशी(बेडके) यांचा काँग्रेस पक्षाच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल
विडणी पंचायत समिती गण ठरतोय फलटण तालुक्यातील राजकीय केंद्रबिंदू
फलटण: विडणी पंचायत समिती गणासाठी आज फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रीय काँग्रेस पार्टी फलटण तालुकाध्यक्ष श्री.महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांनी आपला उमेदवारी अर्ज राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने दाखल केला आहे. विडणी पंचायत समिती गण हा सर्वसाधारण (खुला) प्रवर्गासाठी राखीव आहे. यामुळे फलटण तालुक्यातील राजकीय केंद्रबिंदू हा विडणी पंचायत समिती गण ठरला आहे.
उमेदवारांनी आमच्या माध्यमातून मतदारांना आवाहन केले आहे की,
#विडणी,#पिंप्रद,#माजेरी,#धुळदेव गणातील माझ्या माय–बाप जनतेस 🙏
मी महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी(बेडके),
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने
विडणी पंचायत समिती गण क्र.१२
(सर्वसाधारण पुरुष)
या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
हा अर्ज केवळ कागदावरचा नाही,
तर तो तुमच्या विश्वासाचा, आशेचा आणि हक्काच्या लढ्याचा अर्ज आहे.
लहानपणापासून या मातीशी नातं जोडलं आहे.
गावच्या रस्त्यांवर चालताना,
लोकांच्या अडचणी ऐकताना,
प्रश्नांवर आवाज उठवताना
मी नेहमी तुमच्यातलाच एक कार्यकर्ता राहिलो आहे.
सत्ता, पैसा किंवा घराणेशाही नाही,
आहे फक्त प्रामाणिकपणा, विचारधारा आणि जनतेसाठी झगडण्याची तयारी.
काँग्रेसची मूल्ये – समता, न्याय, लोकशाही आणि सर्वसमावेशक विकास –
हीच माझ्या राजकारणाची दिशा आहे.
हा लढा माझा एकट्याचा नाही,
हा लढा आहे
➡️ अन्यायाविरुद्ध न्यायाचा
➡️ दुर्लक्षितांच्या हक्कांचा
➡️ गावाच्या सर्वांगीण विकासाचा
तुमचा आशीर्वाद, तुमचा विश्वास आणि तुमची साथ
हेच माझं सर्वात मोठं भांडवल आहे.
चला, मिळून एक नवी आशा उभी करूया…
विडणी गणासाठी,
प्रामाणिक नेतृत्वासाठी,
आणि काँग्रेसच्या विचारधारेसाठी.
आपलाच,
महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी(बेडके)
उमेदवार –विडणी पंचायत समिती गण









