विडणी गावाचे सुपुत्र मयुर अभंग यांची जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी निवड  खात्यांतर्गत परीक्षेमधून निवड


विडणी गावाचे सुपुत्र मयुर अभंग यांची जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी निवड

खात्यांतर्गत परीक्षेमधून निवड

 

फलटण  : (प्रतिनिधी: जुबेर कोतवाल) : फलटण तालुक्यातील विडणी गावचे सुपुत्र आणि स्वर्गीय कृष्णराव अभंग (उर्फ गांधी अण्णा) यांचे नातू, मयूर नंदकुमार अभंग यांनी नुकत्याच खात्यांतर्गत झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत मोठे यश प्राप्त केले आहे. या परीक्षेतून त्यांची ‘पोलीस उपनिरीक्षक’ (PSI) या पदावर निवड झाली आहे.

 

मयुर अभंग हे सध्या मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत मुंबई पोलीस दलात मयुर अभंग यांनी १४ वर्षे सेवा दिली आहे. त्यामध्ये ५ वर्षे प्रतिनियुक्तीवर (CBI) सेंट्रल ब्युरो इन्व्हेस्टिगेशन सेवा दिली आहे .

 

 

त्यांच्या या यशाने विडणी गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.मयुर अभंग यांचे प्राथमिक ते पदवीपर्यंतचे शिक्षणः

मयूर अभंग यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा विद्यानगर, विडणी येथे झाले. त्यानंतर त्यांनी माध्यमिक शिक्षण उत्तरेश्वर हायस्कूल, विडणी येथे पूर्ण केले. तर, पुढील पदवीचे शिक्षण त्यांनी ‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक’ येथून यशस्वीरीत्या पूर्ण केले.

 

विविध मान्यवर व ग्रामस्थांकडून कौतुकः

मयूर अभंग यांनी एमपीएससी (MPSC) परीक्षेत मिळवलेल्या या नेत्रदीपक यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. मुंबई मंत्रालय येथील अवर सचिव धीरज कांतीलाल अभंग, फलटण पंचायत समितीचे सदस्य सचिन अभंग, विडणी ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच सागर कांतीलाल अभंग, तसेच मयुर अभंग  मित्रपरिवार,विडणी गावातील सर्व ग्रामस्थ आणि सामाजिक,राजकीय, अशा विविध क्षेत्रातून त्यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव होत आहे


पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!