श्रीमंत भैयासाहेब राजेमाने महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागामध्ये करियर मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न
म्हसवड: उच्च शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी करियर यशस्वी करावे असे प्रतिपादन श्रीमंत भैयासाहेब राजेमाने महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागामार्फत आयोजित करिअर मार्गदर्शन व्याख्यानामध्ये प्रा. दिलीप अनुसे यांनी केले.
रसायनशास्त्र विभागातील बी.एस.सी. अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी करीयर संबंधी उपलब्ध संधींविषयी माहिती मिळण्यासाठी आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. पदवी नंतर उच्चशिक्षणामध्ये उपलब्ध विविध पदव्युत्तर कोर्सेस, संशोधन व विविध सरकारी क्षेत्रातील नोकरीच्या संधी विषयी सखोल मार्गदर्शन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ.संजय दीक्षित उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. एम. एस. चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बी. बी. मैंद तसेच आभार डॉ. पी. एम. म्हालदार यांनी मानले.
सदर कार्यक्रमामध्ये रसायनशास्त्राचे प्रा. के. पी. काळेल, प्रा. पी. बी. साळुंखे, प्रा. ए. बी. खताळ, प्रा. के. सी. वाघमारे तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









