राष्ट्रीय रंगशाला नृत्य स्पर्धेत मुधोजी महाविद्यालयाच्या विद्यार्थी कलाकारांची चमकदार कामगिरी   26 जानेवारी दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या चित्ररथात सहभाग

राष्ट्रीय रंगशाला नृत्य स्पर्धेत मुधोजी महाविद्यालयाच्या  विद्यार्थी कलाकारांची चमकदार कामगिरी

26 जानेवारी दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या चित्ररथात सहभाग

फलटण: दिल्ली येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय रंगशाला नृत्य स्पर्धेत महाराष्ट्र राज्यास तृतीय क्रमांक मिळाला . महाराष्ट्रातील सासनकाठी हे नृत्य सादर केले गेले .यामध्ये मुधोजी महाविद्यालयातील कलाविष्कार विभागातील आदित्य वाघमारे – बी. ए. भाग 3 व आदित्य रणदिवे – बी. ए. भाग 1 या विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग होता.

राष्ट्रीय पातळीवर मुधोजी महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केलेबद्दल या दोन गुणी कलाकार विद्यार्थ्यांचे व नृत्य दिग्दर्शक मा. राजेंद्र संकपाळ सर , कलाविष्कार विभागप्रमुख प्रा. लक्ष्मीकांत वेळेकर यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. पी. एच. कदम , सर्व प्राध्यापक , प्रशासकीय कर्मचारी वर्ग व विद्यार्थ्यांतर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

26 जानेवारी , 2026 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथे होणाऱ्या संचलनामध्ये महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथात ” आत्मनिर्भर भारत” अंतर्गत ” गणेशोत्सव” सादरीकरणात सहभागी होऊन हे विद्यार्थी नृत्य सादर करणार आहेत .

त्यांच्या पुढील वाटचालीस फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर , चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर तसेच सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून 26 जानेवारीच्या दिल्ली येथे होणाऱ्या “गणेशोत्सव ” चित्ररथातील सादरीकरणासाठी शुभेच्छा दिल्या.

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

22
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

error: Content is protected !!