न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज मुलींचे लोणंद येथे इंग्रजी व्याकरणावर आधारित मॉडेल प्रदर्शन व फन गेम्सचा उत्साही कार्यक्रम संपन्न
आरडगांव प्रतिनिधी( प्रतिक भोईटे ) दि. १७ डिसेंबर २०२५: न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज (मुलींचे), लोणंद येथे इंग्रजी विषय समितीच्या वतीने आयोजित ‘इंग्रजी व्याकरण मॉडेल प्रदर्शन व फन गेम्स’ हा उपक्रम प्रचंड उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात इयत्ता ५ वी ते १० वीच्या १०० हून अधिक उत्साही विद्यार्थिनींनी उत्साहाने सहभाग घेतला.विद्यार्थिनींनी इंग्रजी व्याकरणाच्या विविध संकल्पनांवर आधारित सर्जनशील मॉडेल्स, इंटरॅक्टिव्ह गेम्स आणि उपक्रम तयार केले होते. या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेची आवड, स्पष्ट आणि ओघवते बोलणे, आत्मविश्वास आणि सर्जनशीलता वाढवण्यास मोठी मदत झाली. हे प्रदर्शन केवळ ज्ञानार्जनाचे माध्यम नसून, भाषा शिकण्याला खेळकर आणि आनंददायी बनवण्याचे एक उत्तम उदाहरण ठरले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यालयचे मुख्याध्यापक श्री. गोळे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी इंग्रजी विषय समितीच्या प्रमुख वगरे ज्योत्स्ना, खताळ सुप्रिया, जाधव जयदीप तसेच इतर आदरणीय शिक्षकवृंद उपस्थित होते.
मुख्याध्यापक श्री. गोळे आणि ज्येष्ठ शिक्षक श्री. जगताप यांनी विद्यार्थिनींच्या मॉडेल्सचे बारकाईने निरीक्षण करून मार्गदर्शन केले आणि त्यांच्या सर्जनशीलतेसाठी कौतुक केले.हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेच्या प्रती कुतूहल आणि आत्मविश्वास निर्माण करण्याच्या दृष्टीने एक प्रेरणादायी पाऊल ठरला आहे. न्यू इंग्लिश स्कूल, लोणंद येथील हे प्रयत्न शैक्षणिक क्षेत्रात निश्चितच उल्लेखनीय आहेत!









