म्हसवड येथील निकिता शिंगाडे निघाल्या रशिया देशात उच्च शिक्षणाला.
म्हसवड प्रतिनिधी(ओंकार माने): येथील श्रीमंत भय्यासाहेब राजेमाने महाविद्यालय म्हसवड येथील ग्रंथपाल प्रा.मिलिंद शिंगाडे यांची कन्या निकिता मिलिंद शिंगाडे ही रशिया येथील केमरियो विद्यापीठात एम .बी. बी .एस चे उच्चशिक्षण घेण्यासाठी निघाली आहे.
यावेळी तिचे कुटुंबीय,नातेवाईक यांनी तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच तिचे वडील प्रा. मिलिंद शिंगाडे यांचे सर्व स्तरातून आपल्या मुलांना उच्च शिक्षित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नाचे कौतुक होत आहे.
Views: 298









