निंबळक येथील निमजाई देवी मंदिरात चोरी
देवीचा चांदीचा मुकुट चोरट्यांकडून लंपास
भुरट्या चोरांकडून फलटण पूर्व भागात मंदिरे टार्गेट!
फलटण: निंबळक ता.फलटण येथील निमजाई देवीचा चांदीचा मुकुट (अंदाजे किंमत 30,000) अज्ञात चोरट्यांकडून लंपास केला गेला आहे.
फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, आज मंदिराचे पुजारी पुरुषोत्तम गुरव हे सकाळी मंदिर उघडण्यासाठी मंदिरात आले असता. त्यांना मंदिरात चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिस प्रशासनाला माहिती कळवली.
सदर घटनेचे गंभीर ओळखून बरड पोलीस दूर क्षेत्राचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनवळ यांनी, आपले पोलीस कर्मचारी श्री. सागर अभंग ,श्री .शिंदे यांच्यासह डॉग स्कॉड, फिंगर प्रिंट्स पथक यांना घेऊन घटनास्थळी भेट दिली.
यावेळी त्यांच्याकडून गावातील सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज, विविध पुरावे ताब्यात घेतले गेले असून, अज्ञात चोरट्यांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनवळ हे करीत आहेत.
यापूर्वीही मंदिरात चोरी झाली होती. चोरीचा हा दुसरा प्रयत्न असून. या संदर्भात योग्य त्या उपाययोजना कराव्यात असे ग्रामस्थांचे म्हणणे पुढे येत आहे.









