अखिल महाराष्ट्र राज्य घडशी समाज संघाच्या वतीने मान्यवरांना आदरांजली
फलटण: अखिल महाराष्ट्र राज्य घडशी समाज संघ तर्फे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय कै.अजित अनंतराव पवार (दादा) यांना घडशी समाज संघ कडुन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
तसेच घडशी समाजातील एक अनमोल रत्न संगीतकार कै.विश्वनाथ मोरे साहेबांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून आज फलटण येथे घडशी समाज संघ बांधवाकडुन त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी जेष्ठ समाजसेवक श्री.अनिल गणपत वानरे जेष्ठ समाजसेवक श्री.जगन्नाथ धुमाळ सर फलटण तालुका सल्लागार श्री.हरिदास साळुंखे (दादा) राज्य संचालक श्री. रामभाऊ भोसले, सातारा जिल्हा संचालक श्री. ओंकार साळुंखे, फलटण तालुका अध्यक्ष ओंकार यशवंत पवार, फलटण शहर अध्यक्ष अमित सोमनाथ वाडेकर ,श्री.अदित्य मोरे श्री.अनिकेत मोरे, श्री.प्रकाश पवार (सोन्या) , चेतन भोसले, मानव भोसले हे सर्व समाज बांधव उपस्थित होते .
अखिल महाराष्ट्र राज्य घडशी समाज संघ संस्थापक अध्यक्ष श्री अनिल शंकरराव पवार यांचे मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.








