फलटण येथे जागतिक मानवाधिकार दिवस उत्साहात साजरा
फलटण प्रतिनिधी: ता.10 डिसेंबर 2025: मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली शाखा
फलटण यांचे वतीने येथे कुरवली वृद्धाश्रम येथे वृद्धांना फळे वाटप करण्यात आली. व तसेच मुला मुलींची मूकबधिर शाळा गोळेगाव येथे वसतिगृहातील विद्यार्थी यांना फळे व खाऊवाटप करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापका शिंदे मॅडम यांनी सहकार्य केले.
*मानवी हक्काच्या संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या.*
*मानव अधिकार संरक्षण समिती*
———-
””””मानवी हक्क संरक्षण कायदा, १९९३ अंतर्गत महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग स्थापन करण्यात आला असून ती स्वायत्त वैधानिक यंत्रणा आहे. या कायद्यांन्व्ये या समितीचे कार्यचालन होते. सरकारी कर्मचाऱ्यांकडून (पब्लिक सर्व्हट) होणाऱ्या मानवी हक्काच्या उल्लंघनावर नजर ठेवून त्याची चौकशी करणे, सरकारच्या अखत्यारीत असलेल्या कारागृहाला अथवा ज्या ठिकाणी व्यक्तींना स्थानबद्ध केले आहे किंवा उपचार, संरक्षण अथवा सुधारण्यासाठी दाखल केले आहे, तेथे दाखल केलेल्या व्यक्तींच्या राहणीमानाच्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी भेट देणे आणि शिफारशी करणे इत्यादी कार्ये समिती पाहते. पोलिसांनी बेकायदा डांबून ठेवले, पोलिस लॉकअपमध्ये आरोपीचा संशयास्पद मृत्यू झाला की डोळ्यांपुढे मानवी हक्क उल्लंघनाचा विचार येतो. मात्र जातीतून वाळीत टाकणे आणि प्रतिष्ठेने जगण्याच्या हक्कासह अनेक मुद्दे त्यात येत असल्याचे श्री.गजानन भगत महाराष्ट्र राज्य जनसंपर्क अधिकारी मानवाधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली भारत. यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी कार्यक्रमास उपस्थिती गजानन भगत जनसंपर्क अधिकारी महाराष्ट्र राज्य,
- श्री.सुरज चव्हाण पाटील फलटण तालुकाध्यक्ष,सौ.प्रीती भोजने महिला तालुकाध्यक्ष,सौ.सुरेखा गोफने तालुका उपाध्यक्ष, सौ. तेजश्री जाधव फलटण तालुका सचिव, सदस्या सौ.अर्चना सचिन भोसले, यांची प्रमुख उपस्थिती होती.









