फलटण बस डेपोची बस भर रस्त्यात बंद,गाडी जागेवरच उभी!
क्रांतिसिंह नाना पाटील चौकात वाहतुकीस अडचण
फलटण प्रतिनिधी: फलटण बस आगाराचा कारभार हा नेहमीच प्रवाशांसाठी हा दुःखदायक अनुभव मिळत असतो.
विद्यार्थ्यांसाठी बस वेळेत न उपलब्ध असणे, खराब झालेल्या बसेस, बसच्या काचा फुटलेले काचा नसलेल्या बस असतात,
आज सकाळी अशीच एक बस प्रवाशांना घेऊन बाहेर जात असतानाच यशवंतराव चव्हाण हायस्कूल समोरच रिंग रोड वरतीच बंद पडली आहे.तास होऊन ही बस रस्त्यावरच उभी आहे.यामुळे वाहतुकीस अडचण निर्माण होत आहे. बस आगारातील कर्मचारी अधिकाऱ्यांनी याबाबत काहीही गांभीर्य असल्याचे दिसून येत नाही. यामुळे रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या प्रवाशांमधून बस डेपो विषयी नाराजी व्यक्त केली जात आहे.
Views: 101









