मुख्याधिकारी निखिल जाधव ऍक्शनमोडवर
फलटण नगर पालिकेची अतिक्रमणविरोधी मोठी कारवाई
फलटण शहर प्रतिनिधी:-(जुबेरभाई कोतवाल)
फलटण नगर पालिकेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या आदेशाने फलटण शहराच्या मुख्य बाजारपेठेत अतिक्रमणविरोधी मोहीम राबविण्यात आली.
काही दिवसांपूर्वी याच बाजारपेठमधील छोट्या व्यावसाईकांची दुकाने आगीत भसम्सात झाली होती. अतिक्रमणामुळे अग्निशमन दलाची गाडी ज्या ठिकाणी आग लागली त्या ठिकाणी पोहचू शकली नव्हती यामध्ये त्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते .प्रामुख्याने फळ विक्रेते, छोटे व्यावसायिक यांनी केलेली अतिक्रमण पालिकेच्या वतीने काढण्यात आली. दोन दिवसांपूर्वी पूर्व नोटीस देऊन आज ही अतिक्रमणे काढण्यात आली.
या मोहिमेत स्वतः मुख्याधिकारी निखिल जाधव उपस्थित होते.अतिक्रमण मोहीम पुढे अशीच चालू राहील आणि शहरातील रस्ते वाहनधारकांसाठी मोकळे करून दिले जातील असे मुख्याधिकारी निखील जाधव यांच्या वतीने सांगण्यात आले.









