वारकरी साहित्य परिषदेची तालुकास्तरीय पदनियुक्ती जाहीर
आदर्श कीर्तनकार पुरस्कार वितरीत
तरडगाव प्रतिनिधी(सुरेश भोईटे):
वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र यांच्यावतीने तीर्थक्षेत्र श्री. दक्षिणमुखी मारुती मंदिर, सोमंथळी येथे तालुकास्तरीय पदनियुक्ती व आदर्श कीर्तनकार पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला.
कार्यक्रमास वारकरी संप्रदायातील मान्यवर, कीर्तनकार, पदाधिकारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमात वारकरी संप्रदायातील उत्कृष्ट कार्याबद्दल आदर्श किर्तनकार पुरस्कार ह.भ.प. नंदकुमार महाराज कुमठेकर, ह.भ.प. मारुती महाराज माने, ह.भ.प. पांडुरंग महाराज सोडमिसे यांना देणेत आला तर ह.भ.प. जयवंत महाराज भोईटे यांना उत्कृष्ट गायक व आदर्श कीर्तनकार पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
तसेच या वेळी फलटण तालुका समितीच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. ह.भ.प. तानाजी महाराज गायकवाड यांची फलटण तालुका कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. ह.भ.प. रवींद्र महाराज मुसळे यांची फलटण तालुका सहसचिवपदी, ह.भ.प. सुभाष महाराज निंबाळकर यांची फलटण तालुका खजिनदारपदी,सौ. शारदा शिवाजीराव सोडमिसे यांची फलटण तालुका महिला अध्यक्षपदी ह.भ.प. हेमलता ताई सस्ते-साठे यांची फलटण तालुका महिला उपाध्यक्षपदी तसेच ह.भ.प. रोहिणीताई कचरे यांची फलटण तालुका महिला कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
याप्रसंगी सातारा जिल्हाध्यक्ष ह.भ.प. अंकुश महाराज जाधव, सातारा जिल्हा सचिव नामदेव महाराज सुतार, फलटण तालुका अध्यक्ष ह.भ.प. अजित महाराज भोईटे, फलटण तालुका उपाध्यक्ष ह.भ.प. हनुमंत महाराज सोडमिसे, मारुती देवस्थान ट्रस्ट सोमंथळीचे अध्यक्ष श्री. संजय भगवानराव सोडमिसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या मार्गदर्शनपर भाषणातून वारकरी परंपरेचे महत्व अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फलटण तालुका समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.









