फलटण शहरात मटका , चक्री जोरात,  अवैध धंद्यांचा सुळसुळाट!  अवैध धंद्यांना शहर पोलिसांचा वरदहस्त ? फलटण शहरात रामराज्य  आणण्याचे पोलिस निरीक्षक अरविंद काळे यांच्या पुढे आव्हान! अवैध धंदेवाले कोणाचे कार्यकर्ते? राज्यकर्त्यांनीही आत्मपरीक्षण करण्याची गरज!एकाला मोठे करण्यासाठी हजारोंचे प्रपंच उध्वस्त!

फलटण शहरात मटका , चक्री जोरात,  अवैध धंद्यांचा सुळसुळाट!

अवैध धंद्यांना शहर पोलिसांचा वरदहस्त ? फलटण शहरात रामराज्य  आणण्याचे पोलिस निरीक्षक अरविंद काळे यांच्या पुढे आव्हान!

अवैध धंदेवाले कोणाचे कार्यकर्ते? राज्यकर्त्यांनीही आत्मपरीक्षण करण्याची गरज! एकाला मोठे करण्यासाठी हजारोंचे प्रपंच उध्वस्त!

फलटण प्रतिनिधी -सध्या फलटण शहरात चक्री – मटका – सर्रास सुरु आहे. या चक्री – मटका – गुटखा – दारू पायी शेकडो कुटुंबीयांचे संसार उद्‌ध्वस्त होत आहेत. ओपन क्लोजने शहर झोपत नाही, याकडे पोलिसांचे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असून शहर पोलीस गांधारीच्या भूमिकेत असल्याची चर्चा आता शहरात रंगू लागली आहे. तर अवैध धंद्यांना शहर पोलिसांचा वरदहस्त असल्याची चर्चा शहरात सुरु आहे.

अगोदरच गोरगरीब जनता हाताला काम नसल्यामुळे आर्थिक अडचणीत आलेली असताना चक्री – मटक्याने चटका लावला आहे. घरातील काहीही विकून किंवा व्याजाने खासगी सावकारांचे पैसे घेऊन, अनेकजण चक्री – मटक्याचे आकडे लावीत आहेत. यामुळे हजारो कुटुंबांचे संसार उद्‌ध्वस्त होत आहेत. या गंभीर प्रकाराकडे पोलिसांनी तत्काळ लक्ष द्यावे, अशी मागणी फलटणकर नागरिकांतून होत आहे.

शहरातील नवी मंडई परिसरातील नगरपालिकेच्या जागेत अनेक गाळे आहेत त्या ठिकाणी खुलेआम मटका खेळ बुकिंकडून घेतला जातो. तर शहरातील अनेक ठिकाणी चक्री चालू आहे, तसेच काही पानपट्टी दुकानात सर्रास मटका घेतला जात आहे. मटका खेळण्यासाठी शहर व खेड्यापाड्यातील नागरिक येथे गर्दी करीत आहेत.

अवैध धंद्यांना शहर पोलिसांचा वरदहस्त ?

फलटण शहरात जागोजागी पोलीस बंदोबस्त असूनही अवैध धंद्यांना उत आला आहे. मटका, चक्री, जुगार जोरात चालू आहे. हातभट्टीची दारू विक्री होत आहे, मोबाईल चोरी, भुरट्या चोरीचे प्रमाण वाढले आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नाही. अवैध धंद्यांमुळे गोरगरिबांचे संसार मात्र उद्‌ध्वस्त होत आहेत. बेरोजगारीमुळे अनेक तरुण या व्यवसायाकडे आकर्षित होत आहेत. यामुळे शहरात गुन्हेगारी वाढत असून अवैध धंद्यांना शहर पोलिसांचा वरदहस्त असल्याची चर्चा शहरात दबक्या आवाजात सुरु आहे.

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विषयी केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचा राजकीय बालिशपणा: महेंद्रभय्या सूर्यवंशी बेडके (फलटण तालुका अध्यक्ष काँग्रेस पार्टी)यांनी घेतला आमदारांचा खरपूस समाचार स्व.अजितदादा पवार यांच्या विमान अपघात/घातपाताच्या चौकशीची मागणी न करणाऱ्या आमदारांनी ते राष्ट्रवादीचे आमदार की भाजपचे कार्यकर्ते याचा  खुलासा करावा!

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!