फलटण इस्कॉनच्या वतीने भगवद्गीतेवरील परीक्षेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण उत्साहात संपन्न 


फलटण इस्कॉनच्या वतीने भगवद्गीतेवरील परीक्षेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण उत्साहात संपन्न

फलटण : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) तर्फे आयोजित भगवद्गीतेवर आधारित मूल्य शिक्षण संवर्धन ऑनलाइन परीक्षेचा बक्षीस वितरण समारंभ दि. 1 मार्च रोजी, सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे उत्साहात संपन्न झाला.

 

कार्यक्रमास गटशिक्षण अधिकारी श्री.चन्नया मठपती, निर्भया पथकाच्या पोलीस निरीक्षक आयोध्या घोरपडे, तसेच सासवड मंदिराचे प्रमुख श्रीपाद महाप्रभू यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्यू. कॉ च्या प्राचार्य सौ. गायकवाड मॅडम व सौ.वेणुताई हायस्कूल व ज्यू. कॉ च्या प्राचार्य सौ. सुरवसे मॅडम देखील उपस्थित होते. दीपप्रज्वलन व भगवद्गीता-तुळशी रोप देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

 

स्पर्धेत इयत्ता ५ वी ते १० वी तील सुमारे २१०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रथम क्रमांक (५वी ते 10वी मधून) कु.श्रेणी तगारे (यशवंतराव चव्हाण हायस्कूल) हिने पटकावला(गियर सायकल). ८वी ते 10वी मधून द्वितीय श्रेयश डांगे (जय भवानी हायस्कूल), तृतीय अरमान नदाफ (श्रीमंत शिवाजी राजे इंग्लिश मीडियम स्कूल), तर 5वी ते 7वी मधून द्वितीय शिवम अभंग (गुरु द्रोण अकादमी) व तृतीय क्रमांक आद्या खिलारे (मु धोजी हायस्कूल) यांनी मिळविला. या व्यतिरिक्त 6 विजेत्यांना स्मार्ट वॉच व 80 उत्तेजनार्थ बक्षिसे (पाण्याची बॉटल/ टी शर्ट) देण्यात आली. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रके प्रदान करण्यात आली.

 

कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. सचिन सूर्यवंशी यांचे आभार मानण्यात आले. सूत्रसंचालन श्री. श्रावण गुरव यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री राजेंद्र लोणकर सर यांनी केले.


पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!