फलटण येथे 27 फेब्रुवारी रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन


फलटण येथे 27 फेब्रुवारी रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन

 

फलटण:- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे 9वे वर्ष असून दरवर्षी प्रमाणे यंदाही भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

गेली 8वर्ष राज्यातील एकमेव साहित्य संमेलन आयोजित करण्यात येत आहे. राज्यभरातील शेकडो साहित्यिकांना सन्मानित करण्यात येते जाते.त्याप्रमाणे नवोदित कवी साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उदात्त हेतुने संमेलनाचे आयोजन करण्यात येते. तसेच इ.3री ते 12वी व खुल्या गटातील आबालवृद्ध महिला पुरुष यांच्यासाठी निबंध लेखन स्पर्धा आयोजित केली जाते. त्यातूनच लेखन वाचनाची गोडी वाढते.

ऐतिहासिक काळापासून फलटण हि साहित्य पंढरी म्हणून ओळखली जाते कै.श्रीमंत मालोजीराजे ना निंबाळकर यांनी साहित्य समृद्ध व्हावे म्हणून किती तरी कामे अजरामर आहेत. तर कै.प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी तर फलटणची ओळख जागतिक स्तरावर पोहोचवली आहे. अश्या साहित्य पंढरी फलटण मध्ये ॲग्रोन्यूज परिवार चैरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून सलग 8 वर्षे साहित्य सेवा यज्ञ सुरु आहे. यंदाचे 9 वे वर्ष असून यावर्षी सासवड ता फलटण येथील प्रसिद्ध साहित्यिक समीक्षक श्री विजयजी काकडे यांची निवड झाली आहे तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी जेष्ठ पत्रकार व समाजसेवक श्री अरविंद शांतीलाल मेहता व सौ इंदूबेन अरविंद मेहता हे असून इतरही विविध माध्यमातून पुरस्कार दिले जातात. ॲग्रोन्यूज परिवार चैरिटेबल ट्रस्ट आयोजित धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार २०२६ घोषित*

व पदाधिकारी निवड 2026

*संमेलन अध्यक्ष…..

श्री विजयजी काकडे

प्रसिद्ध लेखक,समीक्षक, गझलकार….

*कार्याध्यक्ष..

श्री प्रा.महादेव गुंजवटे….

———–

*जीवन गौरव..

श्री अरविंद मेहता.

सौ इंदूबेन अरविंद मेहता.

जेष्ठ पत्रकार,

समाजसेवक…

————

*राष्ट्रमाता जिजाऊ आदर्श माता..

श्रीमती आशाताई ज्ञानेश्वर दळवी

दुधेबावी

श्रीमती कमल चंद्रकांत मोरे.

सोनवडी..

———–

साहित्य पुरस्कार

उत्कृष्ट कवितासंग्रह*

 

१) इंद्रजित पाटील (चिबाड)

२) महेश खरात (तुझ्या नावासमोर प्रिय लिहिताना)

३) प्रवीण बोपुलकर (अवतरणचिन्ह)

४) आशा दळवी (अनोळखी)

५) बाबासाहेब ढोबळे (रंग जीवनाचे)

६) डॉ.सौ.मानसी पाटील (मनगाभारा)

 

*उत्कृष्ट गझल संग्रह*

 

१) सुधाकर इनामदार (मी चंदन व्हाया बघतो)

२) सिराज शिकलगार (गझल आशा)

३) अनिता बोडके (फसवे मृगजळ)

 

*उत्कृष्ट कथासंग्रह*

 

१) काशीनाथ माटल- सावट

२) हरिश्चंद्र पाटील- खरा वारस

३) यशवंत माळी- वेगळी वाट

 

*उत्कृष्ट कादंबरी*

 

१) डॉ. सौ.स्नेहा राणे- बाळभूक

२) युवराज खलाटे- क्राईम पोस्टिंग

३) लीना देगलूरकर- मुकेस्वर

४) ऋषिकेश गोल्हार- राणोबाचा माळ

 

*उत्कृष्ट ललितसंग्रह*

 

१) अशोक शिंदे- गाव पंढरीच्या वैभवखुणा

 

*उत्कृष्ट संशोधन ग्रंथ*

 

१) डॉ. शिवाजी शिंदे- निवडक स्त्री आत्मकथने

२) डॉ. खंडेराव शिंदे- रुकडी गावचा इतिहास

 

*उत्कृष्ट दिवाळीअंक*

 

१) शब्दवेल- संत साहित्य विशेषांक

२) छायांकित- पोस्टमन

३) सुभाषित- विनोदी विशेषांक

४) दीपोत्सव- युवा राष्ट्रचेतना

 

*उत्कृष्ट प्रवास वर्णन*

 

१) अशोक भालेराव- माझी धम्मयात्रा

 

*उत्कृष्ट चरित्रग्रंथ*

 

१) राजेंद्र घाडगे- राजधुरंधर ताराराणी

 

*उत्कृष्ट बालसाहित्य*

 

१) बाबा जाधव- बालमित्र

२) सौ.आरती लाटणे- कानमंत्र

३) सुचिता बागडे- कुतूहल

 

*विशेष साहित्य सन्मान*

 

१) रविंद्र कोकरे – वैखरीचा जागर ललित गद्य, इजाळ कथासंग्रह

२) मारुती महादेव सस्ते – छप्पर आत्मकथन

३) ज. तु गार्डे ————–

*निबंध लेखन स्पर्धा…

*1)लहानगट)(इ.3ते8वी)

प्रथम क्रमांक..

कु.आदिती नवनाथ तांबे.

जि.प.शाळा निरगुडी.

*द्वितीय क्रमांक..

कु.प्रज्ञा ज्ञानेश्वर बिटले..

श्रीमंत निर्मलादेवी प्राथ.विद्या मंदीर स्पर्धा

निकाल

*तृतीय क्र.

कु.दुर्वा रविंद्र सस्ते..

जि. प.शाळा निरगुडी…

*विभागून तृतीय..

कु.अनया किशोर पवार..

श्रीराम विद्या भवन फलटण..

*उत्तेजनार्थ.. कु.प्रांजल ज्ञानेश्वर जाधव..

श्रीमंत सगुणामाता विद्यालय दालवडी..

2)गट क्र.2(8वी ते 12वी)

*प्रथम क्रमांक

कु.प्रतिक्षा बिभीषण जाधव..

मुधोजी महाविद्यालय फलटण..

*द्वितीय क्रमांक..

अर्णव विकास ननावरे.. यशवंतराव चव्हाण हायस्कुल फलटण…

तृतीय क्रमांक..

कु संपदा हेमंतकुमार कदम..छत्रपती शिवाजी माध्य.विद्यालय गिरवी ता फलटण..

*उत्तेजनार्थ..

कु.संजीवनी संदीप शिंदे..

वाजेगाव निंबळक..

3)खुला गट..

*प्रथम क्रमांक..

श्री प्रकाश शिवाजी भोंगाळे..

मायणी ता. खटाव

*द्वितीय क्रमांक..

श्री राकेश संपत चौधरी.. लोणी जि.चंद्रपूर.. *विभागून द्वितीय.. सौ.हेमलता भरत गुंजवटे..

झिरपवाडी ता फलटण..

*तृतीय क्रमांक..

जनार्दन तुकाराम गार्डे..कापशी ता फलटण…

*उत्तेजनार्थ…

सौ.स्नेहल मयुर तगारे..

फलटण..

*विजेत्या साहित्यिकांचे मन:पूर्वक हार्दिक अभिनंदन-*

———–

*सदरचे पुरस्कार फलटण येथे २७ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित होणाऱ्या ९ व्या छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनात सन्मानपूर्वक प्रदान केले जातील. तरी जागतिक मराठी दिनानिमित्त दि.27फेब्रुवारी 2026शुक्रवार रोजी संपन्न होणाऱ्या संमेलनात सहभागी होऊन साहित्यिकांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन ट्रस्ट चे अध्यक्ष श्री प्रकाश सस्ते निमंत्रक, श्री ज्ञानेश्वर देशमुख यांनी केले आहे….


संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

22
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

error: Content is protected !!