फलटण येथे मराठी राजभाषा दिनानिमित्त धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न
फलटण: जागतिक मराठी राजभाषा दिनानिमित्त 9 वे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले.
यावेळी छत्रपती संभाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांचे हस्ते करून साहित्य संमेलनाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी बोलताना संमेलनाचे उद्घाटक तपोनिधी शिवयोगी नंदगिरी महाराज मठाधिपती शनेश्वर देवस्थान सोळशी यांनी विविध विषयावर भाष्य केले.ते म्हणाले की, साहित्य हा विश्वाचा तिसरा डोळा आहे.साहित्य हे चटके खाललेल्या लोकांकडून निर्माण होते.साहित्यिकांनी दर्जेदार साहित्य निर्माण करावे.लिहित असताना तुमच्या मनात जे विचार येतात ते विचार लिहिले जातात.म्हणून साहित्यिकांनी मन शुद्ध व आचरण शुद्ध ठेवावे.छत्रपती संभाजी महाराज हे साहित्यिक होते.आणि त्यांच्या नावावर महाराष्ट्रात एकमेव साहित्य संमेलन होते आहे ते ही त्यांचे आजोळ असणाऱ्या फलटण मध्ये हा एक दुर्मिळ असा योगायोग आहे.
यावेळी छत्रपती संभाजी महाराज साहित्य सेवा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता व सौ.इंदुबेन मेहता यांना देण्यात आला.राष्ट्रमाता जिजाऊ आदर्श माता पुरस्कार हा आशाताई दळवी (दुधेबावी) कमल मोरे ( सोनवडी) यांना प्रदान करण्यात आला.तसेच विशेष साहित्य पुरस्कार कथा संग्रह,दिवाळी अंक,कादंबरी,प्रवास वर्णन,कविता संग्रह लेखक व कवींना देण्यात आले.
कार्यक्रमाला संमेलन अध्यक्ष म्हणून प्रा.विजय काकडे, कार्याध्यक्ष महादेव गुंजवटे, ज्येष्ठ साहित्यिक जगन्नाथ शिंदे,माझं कवितेच गाव जकातवाडीचे प्रल्हाद पार्टे, मुधोजी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. सुधीर इंगळे, आर्ट ऑफ लिव्हिंगचे डॉ.माधव पोळ, मुधोजी हायस्कूलचे माजी प्राचार्य रवींद्र येवले, जेष्ठ पत्रकार प्रमोद सस्ते,विद्यार्थी , लेखक,कवी ,विद्यार्थी, साहित्यप्रेमी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रविंद्र कोकरे, प्रस्ताविक प्रकाश सस्ते, आभार प्रदर्शन कवी ज.तू. गार्डे यांनी केले.









