मुधोजी महाविद्यालयात संशोधन पद्धती विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न


मुधोजी महाविद्यालयात संशोधन पद्धती विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

 

फलटण : मुधोजी महाविद्यालय, फलटण येथील वाणिज्य विभागामार्फत रिसर्च मेथोडोलॉजी “ब्ल्यू प्रिंट फॉर रिसर्च प्रोजेक्ट रिपोर्ट रायटिंग”या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा यशस्वीरीत्या पार पडली.

 

यावेळी कार्यशाळेची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. प्रास्ताविक डॉ. एस. जी. निकम यांनी केले.

या कार्यशाळेसाठी रिसोर्स पर्सन म्हणून डॉ. शिवराज निकम

(कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, सातारा) यांनी संशोधन पद्धती, संशोधन विषय निवड, उद्दिष्टे व गृहितके, माहिती संकलन,

रिसर्च प्रोजेक्ट रिपोर्ट लेखन तसेच संशोधनातील नैतिक मूल्ये या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ.पंढरीनाथ कदम यांनी

विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्ती विकसित होणे ही आजच्या काळाची गरज असून,अशा कार्यशाळांमुळे विद्यार्थ्यांना संशोधनासाठी सक्षम व आत्मविश्वासपूर्ण बनविण्यास मदत होते, असे मत व्यक्त केले.

 

या कार्यशाळेसाठी IQAC समन्वयक प्रा.डॉ. टी. पी. शिंदे,

वाणिज्य विभागाचे फॅकल्टी इनचार्ज प्रा. ज्योत्स्ना बोराटे,

लीड कॉलेज उपक्रमाचे अध्यक्ष प्रा. सतिश पवार,

वाणिज्य विभागातील सर्व प्राध्यापकवर्ग तसेच

बी.कॉम भाग ३ व एम.कॉमचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ललित वेळेकर, आभार डॉ.प्रशांत शेट्ये यांनी मानले. सदर कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


31
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!