फलटण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा
फलटण प्रतिनिधी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव (औरंगाबाद)संभाजी महाराज नगर विद्यापीठाला मिळावे यासाठी बहुजन समाजाकडून तब्बल 17 वर्षे संघर्ष करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार करण्यात आले.
राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने 26 जुलै 1978 ला ठराव मंजूर करणात आले होते . परंतु या ठरावाला विरोध झाल्याने अनेक वर्षे हा नामविस्तार प्रश्न प्रलंबित होता. त्या साठी बहुजन समाजा कडून अनेक वेळा मोर्चे, अंदोलने करण्यात आली होती. या प्रसंगी काहींना आपला जीव हि गमवावा लागला होता ,त्या नंतर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव 14 जानेवारी 1994 रोजी विद्यापीठाला देण्यात आले नामविस्तार झाले .या दिनाचे औचित्य, आभिमान, साधुन भीम आर्मी संघटने कडून फलटण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, व नामविस्तार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या .
यावेळी अजित संभाजी मोरे, लक्षण काकडे, सुनील पवार, आदेश कांबळे, बंडु काकडे उपस्थित होते..









