बुलढाणा जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांच्या विटंबने प्रकरणी फलटण येथे निषेध  तहसीलदार डॉ.अभिजित जाधव यांना निवेदन


बुलढाणा जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांच्या विटंबने प्रकरणी फलटण येथे निषेध

तहसीलदार डॉ.अभिजित जाधव यांना निवेदन

 

फलटण : राजमाता जिजाऊ यांच्या जन्मभूमित बुलढाना जिल्हयातील चिखला काकड गावात, तालुका लोणार, जि. बुलढाणा येथे दिनांक १७/०२/२०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची जाणीवपूर्वक विटंबना करण्यात आली असल्याची घटना समोर आली असून आज फलटण येथील सकल मराठा समाजाच्या वतीने याबाबत फलटणचे तहसीलदार डॉ.अभिजित जाधव यांना निवेदन देण्यात आले आहे.

 

यावेळी सकल मराठा समाजाच्यावतीने फलटण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी व विटंबना करणाऱ्या आरोपींना अटक झाली पाहिजे या घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला होता.यानंतर तहसील कार्यालय येथे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

 

निवेदनात म्हटले आहे की,घडलेली घटना अत्यंत निषेधार्ह असून महाराष्ट्राच्या अस्मितेवर आघात करणारी आहे.

 

सदर घटना समजताच महिला भगिनी व नागरिक पुतळ्याचे रक्षण करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. मात्र काही समाजविघातक प्रवृत्तीच्या व्यक्तींनी महिला भगिनी तसेच निरपराध लहान मुलींवर अमानुष मारहाण केली. ही कृती मानवतेला काळिमा फासणारी असून कायद्याचा उघड अवमान करणारी आहे.

 

तरी आमची ठाम मागणी आहे की, पुतळ्याची विटंबना करणाऱ्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी.

 

यावेळी माऊली सावंत,किरण भोसले ,विक्रम शितोळे ,धनंजय महामुलकर ,राम सपकाळ ,मच्छिंद्र भोसले, अक्षय तावरे यांच्यासह मराठा सेवक कार्यकर्ते उपस्थित होते.


देव व धर्माच्या नावावर होणाऱ्या ढोंगी बुवाबाजीला आमचा विरोध; समाजाने सदविवेक बुद्धीचा वापर करावा! अजिंक्य मित्र मंडळ टाकळवाडे येथे अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या समाज प्रबोधनपर कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! 

34
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

देव व धर्माच्या नावावर होणाऱ्या ढोंगी बुवाबाजीला आमचा विरोध; समाजाने सदविवेक बुद्धीचा वापर करावा! अजिंक्य मित्र मंडळ टाकळवाडे येथे अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या समाज प्रबोधनपर कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! 

error: Content is protected !!