लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शाळेत संविधान व पत्रकार दिन साजरा 

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शाळेत संविधान व पत्रकार दिन साजरा

फलटण शहर प्रतिनिधी:-(जुबेर कोतवाल )दि.25| लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर पालिका, मंगळवार पेठ फलटण येथील प्रशालेत भारतीय संविधान दिन व पत्रकार दिन साजरा करण्यात आला. भारतीय पत्रकार संघाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबाबत जागरूकता निर्माण झाली

कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भारतीय पत्रकार संघाचे उपजिल्हाध्यक्ष प्रा. विकास शिंदे यांनी वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. “वाचनामुळे विचार प्रगल्भ होतात आणि व्यक्तिमत्त्व घडते. विद्यार्थ्यांनी वाचनाची गोडी लावून वाचन संस्कृती जपली पाहिजे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

यावेळी पत्रकार प्रमोद सस्ते यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व विशद करताना सांगितले की, “भारतीय संविधान हा या देशाचा आत्मा असून लोकशाहीचा कणा आहे. संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला आपले अधिकार व कर्तव्य समजतात. विद्यार्थ्यांनी लहान वयातच संविधानाची ओळख करून घेणे आवश्यक आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर भारतीय पत्रकार संघाच्या वतीने विद्यार्थ्यांना वही व पेनचे वाटप करण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

या कार्यक्रमास भारतीय पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष संदीपकुमार जाधव,तालुकाध्यक्ष राजकुमार काकडे, जिल्हा उपाध्यक्ष विकास शिंदे, पत्रकार हल्लाविरोधी समिती अध्यक्ष आप्पासाहेब तांबे, , तालुका सचिव अमोल पवार,सहसचिव गणेश भोईटे, शकिल सय्यद, संघटक प्रशांत सोनवणे, प्रगती चळवळचे संपादक प्रमोद सस्ते, जुबेर कोतवाल तसेच लोकशाही भारतचे संपादक सागर चव्हाण, प्रशालेचे मुख्याध्यापक बालाजी मुकाडे ,हिरामण मोरे ,बंडू यादव ,शिवाजी जाधव ,चैत्राली कांबळे,सारिका काकडे, अंबिका काकडे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

22
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

error: Content is protected !!