पूर नियंत्रण आणि मृदाक्षय प्रतिबंधासाठी पी. व्ही. सी. अस्तर युक्त प्रणाली आणि पद्धतीवर आधारित पेटंट प्रकाशित.


पूर नियंत्रण आणि मृदाक्षय प्रतिबंधासाठी पी. व्ही. सी. अस्तर युक्त प्रणाली आणि पद्धतीवर आधारित पेटंट प्रकाशित.

फलटण येथील प्रा.डॉ.विशाल सर्जेराव घोलप यांचे संशोधन

सातारा: कृषी क्षेत्रातील पूरनियंत्रण, मृदा-संवर्धन आणि पावसाच्या पाण्याच्या संचयनासाठी विकसित करण्यात आलेल्या अभिनव तंत्रज्ञानाला भारतीय पेटंट कार्यालयाने मान्यता दिली आहे. “Method and System for Preservation and Harvesting in Trench Lined with PVC Sheet to Prevent Flood and Soil Erosion” या शोधनाविन्यासाठी संशोधक मंडळाला अधिकृत पेटंट जाहीर करण्यात आले आहे. या अभिनव तंत्रज्ञानामुळे ग्रामीण शेतीसाठी पावसाचे पाणी साठवणे, गळती टाळणे आणि वर्षभर सिंचनाची सोय उपलब्ध होणे अधिक सुलभ होणार आहे.

या संशोधनात महाराष्ट्रातील पाच संशोधकांनी संयुक्तपणे कार्य केले आहे. संशोधकांमध्ये डॉ. अर्जुन शिवाजी वाघ, सहाय्यक प्राध्यापक व विभागप्रमुख, भूगोल विभाग, पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय, तासगाव; डॉ. राणी श्रीरंग शिंदे, सहाय्यक प्राध्यापक व विभागप्रमुख, अर्थशास्त्र विभाग, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, पाचवड, डॉ. सुनील सोमा गवित, सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग, तासगाव महाविद्यालय; डॉ. विशाल सर्जेराव घोलप, सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग, छत्रपती शिवाजी महाविद्यालय, सातारा; आणि डॉ. मोहन अर्जुन वसावे, सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग, के चौधरी आर्ट्स, एसजी पटेल कॉमर्स और बाबाजी बीजे पटेल साइंस कॉलेज, तलोदा, जि. नंदुरबार यांचा समावेश आहे.

शेताच्या समोच्च रेषांनुसार तयार करण्यात येणाऱ्या GPS-आधारित ट्रेंचमध्ये जाड PVC शीटचे अस्तर बसवून पावसाचे अतिरिक्त पाणी भूमिगत टाक्यांमध्ये साठवण्याची ही पद्धत कृषी क्षेत्रासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

या पेटंटला मिळालेली मान्यता ही संशोधकांसाठी अभिमानाची बाब असून भूगोल विभागाचा व छत्रपती शिवाजी महाविद्यालयचा पहिला पेटंट असून त्याबद्दल महाविद्यालयाचे मा.प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे साहेब, उपप्राचार्य डॉ.रामराजे माने देशमुख, प्रा. डॉ. अनिलकुमार वावरे आणि विभाग प्रमुख प्रा. डॉ. आर. आर. साळुंखे तसेच सर्व प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह शैक्षणिक समुदाय आणि स्थानिक समाजात या सर्वांचे मोठे कौतुक आणि अभिनंदन होत आहे.


मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

35
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

error: Content is protected !!