शिवसेनेचे विडणी जिल्हा परिषद सदस्य व सांगवी पंचायत समिती सदस्य निवडून येण्यात टाकळवाडे गावातून मिळालेले निर्णायक मतदान शिवसेना पिंटू इवरे गटाचे!
शिवसेनेचे तालुकाध्यक्ष नानासाहेब (पिंटू) इवरे निर्णायक किंगमेकरच्या भूमिकेत!
जर खासदार गटाचे काम केले असते तर पंचायत समितीवर आज खासदार गटाची सत्ता आली असती.?
वाचा सविस्तर
जिल्हा परिषद व पंचायत समिती फलटण
विश्लेषण भाग – 1
फलटण: नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे विडणी गटाचे उमेदवार सौ. ज्योती गौतम मोरे व सांगवी पंचायत समिती उमेदवार सौ. पुष्पा रामचंद्र चोपडे यांनी विजय मिळवला आहे.
यापूर्वी शिवसेना पिंटू इवरे गटाने खासदारकिला निवडणुकीत रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या बाजूने मतदान करून गावातून लीड दिले होते.तसेच आमदारकीला विद्यमान आमदार सचिन पाटील यांच्या बाजूने मतदान करून त्यांना ही लीड दिले होते.
यावेळच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना राजे गट यांच्या बाजूने व शिवसेना पक्षाच्या उमेदवार बरोबर ठाम उभे राहण्याची भूमिका पिंटू इवरे यांच्या गटाने घेतली.
याचेच फलित म्हणून गावातून शिवसेनेच्या पंचायत समिती उमेदवाराला 289 मताचे लीड मिळाले आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे पंचायत समिती सांगवी उमेदवार हे 273 च्या फरकाने निवडून आलेले आहेत. जर पिंटू इवरे यांच्या गटाने खासदार गटाचे काम केले असते तर येथील उमेदवार हा खासदार गटाच्या विचाराचा निवडून आला असता. व तालुक्यात 8 राजे गट सदस्य व 8 खासदार गट सदस्य ही झालेली परिस्थिती ही वेगळी झाली असती. व खासदार गट 9 सदस्य झाले असते व राजे गट 7 सदस्य संख्या झाली असती. व पंचायत समितीवर खासदार गटाची सत्ता ही आली असती.
तसेच विडणी जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे निवडून आलेल्या उमेदवार ह्या 93 मताच्या फरकाने निवडून आलेल्या आहेत. येथे पिंटू इवरे यांच्या गटाने ही त्यांच्या बाजूने मतदान केले व त्यांना गावातून मताधिक्य दिले आहे. पिंटू इवरे यांच्या निर्णायक मतदान भूमिकेमुळे ही सीट लागल्याचे दिसत आहे. खासदार गटाच्या बाजूने भूमिका घेतली असती तर तालुक्यात आज 5 राजे गटाचे जिल्हा परिषद सदस्य आहेत त्या ऐवजी 4 सदस्य झाले असते.
एकंदरीत शिवसेनेचे तालुकाध्यक्ष पिंटू इवरे यांच्या गटाने घेतलेली भूमिका ही आज फलटण तालुक्यात किंगमेकरची भूमिका दिसून येत आहे. त्यांनी भाजपचे काम केले असते तर आज चित्र वेगळे असते व पंचायत समितीवर खासदार गटाचे 9 सदस्यांनिशी वर्चस्व असते.
परंतु पिंटू इवरे यांच्या निर्णायक कामगिरी मुळे त्यांचे नाव फलटण तालुक्यातील राजकीय वर्तुळामध्ये किंगमेकर म्हणून चर्चिले जात आहे.









