फलटण येथील दिव्यांग शिक्षकांना निवडणुकीचे काम, शिक्षण विभागाचा असंवेदनशीलपणा!  प्रहार दिव्यांग कर्मचारी संघटनेचे तहसीलदार यांना निवडणूक कामातून सूट मिळण्यासंदर्भात निवेदन 

फलटण येथील दिव्यांग शिक्षकांना निवडणुकीचे काम, शिक्षण विभागाचा असंवेदनशीलपणा

प्रहार दिव्यांग कर्मचारी संघटनेचे तहसीलदार यांना निवडणूक कामातून सूट मिळण्यासंदर्भात निवेदन

फलटण: प्रहार दिव्यांग शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटनेचे प्रांताधिकारी तसेच तहसीलदार फलटण यांना निवडणुकीचे तसेच बीएलओचे काम न देण्याबाबत आज निवेदन देण्यात आले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत. या निवडणूक प्रक्रियेमध्ये दिव्यांग कर्मचाऱ्यांना शासनाने निवडणूक तसेच BLO कामातून वगळण्याबाबत, शासन निर्णय, GR– परिपञक असताना देखील प्राथमिक शिक्षण विभाग यांचेकडून दिव्यांग शिक्षकांची नावे ही तहसीलदार ऑफिस फलटण यांना कळवण्यात आली होती.त्यामुळे शिक्षण विभाग पंचायत समिती फलटण यांचेकडील दिव्यांग शिक्षक कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामाबाबत आदेशित केलेले आहे. या घटनेबाबत फलटण पंचायत समिती शिक्षण विभागाचा असंवेदनशीलपणा पुढे येत आहे. खरे तर चांगले शिक्षक उपलब्ध असताना ही आपल्या मर्जीतील शिक्षकांना निवडणुकीची कामे न लावण्यासाठी दिव्यांग शिक्षकांची नावे पाठवण्यात आली आहेत का?हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यामुळे शिक्षण विभागाची खाबूगिरी पुढे आलेली आहे.याबाबत पंचायत समिती फलटणचे गटशिक्षणाधिकारी चन्नय मठपती यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी उडवा-उडीची उत्तर दिली. व या प्रकरणाशी शिक्षण विभागाचा संबंध नसलेचे सांगितले.

ते आदेश रद्द होण्यासाठी तसेच इथून पुढे दिव्यांग कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे तसेच BLO काम न देण्याबाबत संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, दिव्यांग कर्मचाऱ्यांना शासनाने निवडणुकीच्या कामातून वगळले आहे , तसेच दिव्यांग कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे तसेच BLO चे कोणतेही काम देण्यात येऊ नये,या आशयाचा शासन निर्णय जीआर असतानाही निवडणुकीचे काम दिव्यांगांना देण्यात आले आहे.

दिव्यांग कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे कामामध्ये खूप मानसिक व शारीरिक त्रास होतो,शारीरिक व मानसिक दृष्ट्या मर्यादा येतात,म्हणूनच शासनाने दिव्यांग कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या आणि BLO च्या कामातून प्राधान्याने सूट दिलेली आहे.

यावेळी निवेदन देण्यासाठी  प्रहार शासकीय–निमशासकीय कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष ,विकास बोंद्रे, उपाध्यक्ष अभिनव कदम आणि संघटनेचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

22
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

error: Content is protected !!