सांगवी पंचायत समिती गणातून शिवसेनेच्या सौ.पुष्पा रामचंद्र चोपडे यांची बहुमताने निवड फलटण पंचायत समिती सभापती पदासाठी प्रबळ दावेदार ,राजे गटाकडून OBC महिला प्रवर्गातून निवडून आलेल्या एकमेव महिला 


सांगवी पंचायत समिती गणातून शिवसेनेच्या सौ.पुष्पा रामचंद्र चोपडे यांची बहुमताने निवड.

 

फलटण पंचायत समिती सभापती पदासाठी प्रबळ दावेदार!

राजे गटाकडून OBC महिला प्रवर्गातून निवडून आलेल्या एकमेव महिला

फलटण: फलटण पंचायत समितीचा निवडणुकीचा निकाल लागला असून यामध्ये राजाळे गावच्या रहिवाशी सौ.पुष्पा रामचंद्र चोपडे यांची बहुमताने निवड झालेली आहे. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या लढतीत त्यांना जनतेने मताचा कौल दिला आहे.

 

फलटण पंचायत समितीचे सभापती पदाचे आरक्षण हे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (OBC महिला) असे आहे. राजे गटाकडून ओबीसी प्रवर्गांमधून निवडून आलेल्या एकमेव महिला या सौ.पुष्पा चोपडे आहेत.त्यामुळे त्या सभापतीपदाच्या राजे गटाकडून प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत.

 

 

त्यांचे या विजयाबद्दल शिवसेनेचे नेते श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष नानासाहेब(पिंटू) इवरे, राजाळे सोनगाव, सोमंथळी, सांगवी, टाकळावाडे गावचे राजे गटाचे नेते, कार्यकर्ते, ग्रामस्थ , नातेवाईक यांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले आहे.


पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!