राजाळे येथील शेतकरी उदयसिंह निंबाळकर यांच्या विहिरीवरील साठ हजार रुपये किमतीची शेतीपंपाची मोटर चोरीला
फलटण पूर्व भागात मोटर चोर सक्रिय,
पोलिसांपुढे भुरट्या चोरांचे आव्हान!
फलटण : शेतकरी हा अन्नदाता समजला जातो. शेती करत असताना त्याला अनेक संकटाला सामोरे जावे लागते. यामध्ये अतिवृष्टी, दुष्काळजन्य परिस्थिती, कष्टाने पिकवलेल्या शेतमालाला योग्य दर मिळत नाही. यासह अनेक प्रश्न त्याच्यापुढे असतात. यामध्ये आता फलटण पूर्व भागातील शेतकऱ्यांपुढे एक नवीन समस्या उभी राहिलेली दिसून येत आहे. ती म्हणजे विहिरीवरील शेती पंपाच्या मोटरी चोरीला जाणे.
रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेऊन फलटण पूर्व भागात विद्युत मोटर चोर सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. फलटण पूर्व भागात पोलिसांपुढे या भुरट्या चोरांनी एक नवे आव्हान उभे केले आहे.
नुकतीच राजाळे येथील शेतकरी उदयसिंह शिवाजीराव निंबाळकर यांच्या जमिन गट नं.32 शेतातील विहीरीवरील पाण्याची 60,000/- किंमतीची एक लक्ष्मी कंपनीची स्टीलची बॉडी असलेली हिरव्या रंगाची पाण्याची 5 एच.पी.ची मोटर अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे.
अज्ञात चोरट्याविरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास पाडवी करत आहेत.
या घडलेल्या घटनेमुळे पूर्व भागात पुन्हा एकदा विहिरीवरील विद्युत मोटर चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे. असे दिसून येत आहे.यामध्ये असणारे चोर हे जुनेच आहेत की नवीन चोर तयार झाले आहेत हा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडू लागला आहे. या भुरट्या चोरांमुळे पोलिसांच्या पुढे एक नवे आव्हान उभे राहिले आहे हे मात्र निश्चित.
“माझ्या शेतावरील मोटर चोरणाऱ्यांना पकडून मला न्याय मिळावा.”उदयसिंह निंबाळकर ,शेतकरी राजाळे ता.फलटण
“शेतकऱ्यांच्या विहिरीवरील विद्युत मोटर चोरणाऱ्या टोळीला लवकरात लवकर पकडू.” संदीप जगताप, पोलीस निरीक्षक, फलटण ग्रामीण पोलीस ठाणे









