राजाळे गावच्या मा.सरपंच सौ.कविता महिपाल व सरपंच पती दत्तात्रय महिपाल यांना घरात घुसून मारहाण! गावातील तरुणांवर गुन्हा दाखल! 

राजाळे गावच्या मा.सरपंच सौ.कविता महिपाल व सरपंच पती दत्तात्रय महिपाल यांना घरात घुसून मारहाण!

गावातील तरुणांवर गुन्हा दाखल!

फलटण: राजाळे गावच्या माजी सरपंच सौ.कविता महिपाल व त्यांची पती दत्तात्रय महिपाल यांना घरात घुसून मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण पुढे आले आहे.

याबाबत ग्रामीण पोलीस ठाणे फलटण येथून मिळालेल्या माहितीनुसार दत्तात्रय महिपाल वय-56 वर्षे, व्यवसाय शेती रा. राजाळे ता. फलटण जि. सातारा यांनी समक्ष फलटण ग्रामीण पोलीस ठाणेस समक्ष हजर राहुन जबाब दिला असून त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, मी वरिल ठिकाणचा रहीवासी असुन माझे घरी मी व माझी पत्नी कविता असे एकत्रात राहाणेस आहेत. दिनांक 07/02/2026 रोजी राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकितील मतदानाची प्रक्रिया होती. मी विडणी गटातील जिल्हा परिषदेच्या राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवार सुषमा अविनाश मोरे व पंचायत समिती फलटणच्या राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवार सुषमा संजय सोडमिसे यांचेसाठी काम करत होतो.

दिनांक 08/02/2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर मी माझे राजाळे येथील सलुनच्या दुकानात काम करीत असताना आमचे गावातील स्वप्निल रमेश निकम, सोन्या धनाजी भोईटे हे माझे दुकानात आले व मला म्हणाले की तु राजकीय पक्षाचे लय काम करतोय पक्षाच्या जिवावार लय उड्या मारतोय असे म्हणुन तुला आता दाखवतो तुझा मेंदुच काढुन ठेवतो असे म्हणुन दमदाटी करुन धमकी देवुन तेथुन ते निघुन गेले.

नंतर दि .10/02/2026 रोजी मी सोमेश्वर येथे माझे पाहुण्याकडे गेलो होतो. दुपारी 04.30 वाचे, सुमारास मी माझे घरी येवुन घरात चहा पित बसलो असताना आमचे गावातील सुभाष धनाजी भोईटे, अनिकेत अशोक भोईटे यांनी घरामध्ये येवून तु रानात घावलास की तुला मारून टाकनार आहे असे म्हणून त्यांनी हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली त्यांचे सोबत आलेले स्वप्निल रमेश निकम, सोन्या धनाजी भोईटे यांनी मला व माझे पत्नी कविता हिस शिवीगाळ दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे .आमचे भांडणाचा आवाज ऐकुन आमचे शेजारील राहणारे संतोष महादेव महिपाल, शरद महाराज निंबाळकर यांना घराकडे येत असलेले पाहून ते त्यांची गाडी आमच्या घरासमोर सोडुन पळुन गेले आहेत.

तरी दिनांक 10/02/2026 रोजी सायंकाळी 4.30 वा सुमारास मौजे राजाळे ता.फलटण गावचे हदीतील माझे राहते घरात 1) स्वप्निल रमेश निकम 2) सोन्या धनाजी भोईटे 3) सुभाष धनाजी भोईटे 4) अनिकेत अशोक भोईटे सर्व रा.राजाळे ता. फलटण यांनी माझे घरात येवून मला व माझी पत्नी सौ.कविता हिस मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे.असा जबाब दत्तात्रय महिपाल यांनी पोलिस ठाण्यात दिला आहे.

या घटनेबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देवेंद्र पाडवी करत आहेत.

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

22
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

error: Content is protected !!