सौ.वेणूताई चव्हाण हायस्कूल तरडगावचे शिक्षक संतोष डांगे सर यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर
रविवारी 18 ऑक्टोंबरला पुण्यामध्ये होणार वितरण सोहळा
फलटण: श्री.संतोष गणपत डांगे,उपशिक्षक – सौ वेणूताई चव्हाण हायस्कूल तरडगाव ता. फलटण जि सातारा,नेमणूक – 16/06/1994
सेवा-32 व वर्ष सेवा श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटण,30 वर्ष-समाजसेवा – जिंती ता. फलटण- जि सातारा,10 वर्ष ग्रामपंचायत सदस्य जिंती ग्रामपंचायत, 10 वर्ष-संचालक / चेअरमन – श्रीराम एज्युकेशन सोसायटी सेवक पतसंस्था फलटण,10 वर्ष – सेवा संचालक-जितोबा पाणीवाटप संस्था जिंती ता फलटण ,2019 ते 2021-कोरोना काळात जिंती वार्ड क्र 1 मध्ये कोरोना पिडीतांना मदतकार्य,सौ. वेणूताई चव्हाण हायस्कूल इमारत बांधकाम समितीमध्ये – 2021 ते 2025 या काळात फंड गोळा करणे, व बांधकाम कार्यात सहभाग,सौ. वेणूताई चव्हाण हायस्कुल- पटसंख्या गुणांकात वाढ, स्वच्छता अभियान उपक्रमात सहभाग.शाळा व पालक समन्वय, विद्यार्थ्यांच्या अडी अडचणी सोडवतात,प्रशासन,संस्था व ग्रामस्थ समन्वय राखतात.
श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे सौ. वेणूताई चव्हाण हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तरडगाव येथील उपशिक्षक श्री संतोष गणपत डांगे सर यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा कार्यक्रम रविवार दिनांक 18 ऑक्टोंबर 2026 रोजी पुण्यामध्ये महाराष्ट्र राज्य विधान परिषदेेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.
याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्रीमती साविताकाकी सुभाषराव सूर्यवंशी बेडके, संस्थेचे मानद सचिव श्री सचिन सुभाषराव सूर्यवंशी-बेडके, संस्थेचे नियामक मंडळाचे सदस्य श्री महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी- बेडके,प्राचार्या सौ.काकडे मॅडम,पर्यवेक्षक श्री. निळकंठ निंबाळकर सर,व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य ,शिक्षक, नातेवाईक व सर्व ग्रामस्थांनी त्यांचे या बद्दल अभिनंदन केले आहे.









