निंबळक गावचे सुपुत्र प्रसिद्ध उद्योजक राम निंबाळकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा , वाढदिवसानिमित्त शाळेला पाच लाख रुपयांची देणगी 


निंबळक गावचे सुपुत्र प्रसिद्ध उद्योजक राम निंबाळकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

वाढदिवसानिमित्त शाळेला पाच लाख रुपयांची देणगी

 

फलटण: निंबळक ता.फलटण गावचे सुपुत्र , प्रसिद्ध उद्योजक राम निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे निंबळक मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करून वाढदिवस साजरा करण्यात आला.

 

यामध्ये जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तू व खाऊचे वाटप करण्यात आले.

तसेच महिलांकरिता रांगोळी व पाककला स्पर्धा घेण्यात आल्या. ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी हिमोग्लोबिन चेकअप शिबिर घेण्यात आले.

 

वाढदिवसाचे औचित्य साधून निंबळक गावातील व परिसरातील विविध विकास कामांचे उद्घाटन समारंभ घेण्यात आले.यावेळी उद्योजक रामसाहेब निंबाळकर यांनी जिल्हा परिषद केंन्द्र शाळा निंबळक शाळेस शैक्षणिक सुविधांसाठी रक्कम रु. ५ लाख देण्याचे जाहिर केले.

 

याप्रसंगी सरपंच सौ.सिमा बनकर,महानुभव मठाचे मठाधीपती नरेंन्द्र शास्त्री ,ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता ,नंदकुमार भोईटे,माजी पंचायत समिती सदस्य संजय कापसे,काशिराम मोरे ,तंटामुक्ती अध्यक्ष जयराम मोरे ,शिवाजी पिसाळ,मुख्याध्यापिका सौ.शिंदे मॅडम,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष वैभव निंबाळकर , उपाध्यक्ष संदीप कुंभार व ग्रामस्थ उपस्थित होते.


मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

35
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

error: Content is protected !!