महाराष्ट्र शासन करिअर कट्टा राज्य नियोजन समन्वयक पदी निवड  रामेश्वर मोरे यांची निवड उद्योग मंत्र्याच्या हस्ते मुंबईत गौरव


महाराष्ट्र शासन करिअर कट्टा राज्य नियोजन समन्वयक पदी निवड  रामेश्वर मोरे यांची निवड

उद्योग मंत्र्याच्या हस्ते मुंबईत गौरव

 

पुणे प्रतिनिधी (प्रा.रोहिदास खेडकर):महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहीती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणारा करिअर कट्टा उपक्रम.महाराष्ट्रातील तरूणांच्या करिअरला दिशा देण्याचे काम करिअर कट्टाकडुन होत आहे.करिअर कट्टाचा पाचवा वर्धापन दिन. दि.25 फेब्रुवारी रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर याठिकाणी पार पडला.या कार्यक्रमात गेली चार वर्ष करिअर कट्टामध्ये सातत्यपूर्ण काम करणारे,युथ आयकॉन रामेश्वर परमेश्वर मोरे यांची नुकतीच करिअर कट्टा राज्य नियोजन समन्वयक या प्रतिष्ठित पदासाठी निवड झाल्याबद्दल मा.श्री.रविंद्र साठे(सभापती खादी ग्रामोद्योग, राज्यमंत्री दर्जा) यांच्या शुभहस्ते आणि राज्याचे उद्योग मंत्री मा.ना.उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला.रामेश्वर मोरे हे राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या संपर्कातून असुन त्यांनी विद्यार्थ्यांची साखळी करिअर कट्टाच्या माध्यमातून तयार केली आहे.

 

महाराष्ट्र माहीती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष मा.यशवंत शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली ते काम करत आहेत. या सत्कार सोहळ्या प्रसंगी मा.डॉ.नामदेव भोसले (सहसचिव,मराठी भाषा विभाग,महाराष्ट्र शासन),मा.श्री.प्रफुल्ल पाठक(अध्यक्ष,सोलर सोसायटी ऑफ इंडिया),मा.श्री.सचिन इटकर(क्षेत्रीय संचालक,महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ),मा.श्री.मंदार फणसे(Editer News 18 lokmat) हे मान्यवर उपस्थित होते.या यशाबद्दल त्यांचे महाराष्ट्रभरातून अभिनंदन होत आहे.


देव व धर्माच्या नावावर होणाऱ्या ढोंगी बुवाबाजीला आमचा विरोध; समाजाने सदविवेक बुद्धीचा वापर करावा! अजिंक्य मित्र मंडळ टाकळवाडे येथे अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या समाज प्रबोधनपर कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! 

34
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

देव व धर्माच्या नावावर होणाऱ्या ढोंगी बुवाबाजीला आमचा विरोध; समाजाने सदविवेक बुद्धीचा वापर करावा! अजिंक्य मित्र मंडळ टाकळवाडे येथे अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या समाज प्रबोधनपर कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! 

error: Content is protected !!