राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पार्टीची फलटण तालुक्यात भूमिका काय? पक्ष विलीनीकरणामुळे उमेदवार उभे केले नसले तरी शरद पवार यांना मानणारा वर्ग काय भूमिका घेणार? फलटण मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दोन आमदार असून आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर की आमदार सचिन पाटील यांच्या गटाला पाठिंबा देणार?


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पार्टीची फलटण तालुक्यात भूमिका काय?

 

पक्ष विलीनीकरणामुळे उमेदवार उभे केले नसले तरी शरद पवार यांना मानणारा वर्ग काय भूमिका घेणार?

 

फलटण मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दोन आमदार असून आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर की आमदार सचिन पाटील यांच्या गटाला पाठिंबा देणार?

 

फलटण: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष व शरद पवार यांच्या विचारावर प्रेम करणारी कट्टर मते फलटण तालुक्यात जवळपास 25 ते 30 हजार आहेत.

 

या निवडणुकीमध्ये पक्ष विलीनीकरण या मुद्द्यामुळे फलटण तालुक्यात शरदचंद्र पवार पक्ष निवडणुकीच्या रिंगणात जरी नसला तरी किंगमेकरच्या भूमिकेत राहू शकतो ! कारण पक्षाला मानणारी मते (अंडरग्राउंड करंट)ही कोणाच्या पारड्यात पडणार आणि कुणाला त्याचा फायदा होणार हे खूप महत्त्वाचे आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मा.फलटण तालुकाध्यक्ष धर्मराज पाटील व त्यांच्या टीमने प्रत्येक जिल्हा परिषद गट दौरा केला आहे. त्यामुळे पक्ष सक्रिय केला असून या लोकांच्या मताची भूमिका खूप महत्त्वाची राहणार आहे. फलटण तालुक्यात राष्ट्रवादीचे दोन आमदार आहेत. आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील.  जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत रामराजे हे शिवसेना युती बाजूने सक्रिय आहेत तर सचिन पाटील भाजप युतीच्या बाजूने आहेत. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची मते ही मते कोणाच्या पारड्यात पडणार ? कोण आपल्या बाजूने ही मते वळवणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!