सौ.रुपाली अमोल सस्ते यांची प्रचंड बहुमताने नगरसेवक पदी निवड

सौ.रुपाली अमोल सस्ते यांची प्रचंड बहुमताने नगरसेवक पदी निवड

फलटण शहर प्रतिनिधी(जुबेर कोतवाल): फलटण नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सौ.रुपाली अमोल सस्ते या प्रभाग क्र 13 मधून विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. त्या युवा नेते अमोल सस्ते यांच्या पत्नी आहेत.

अमोल सस्ते यांनी भारतीय जनता पक्षाचे माजी शहर अध्यक्ष तसेच भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष पद ही भूषवले आहे.अमोल सस्ते हे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि निष्ठावंत म्हणून त्यांची ओळख आहे.

भारतीय जनता पार्टी फलटण शहर तसेच तालुक्यात पक्ष बांधणीत आणि पक्ष वाढीत त्यांचे मोठे योगदान आहे सौ.रुपाली अमोल सस्ते यांना विक्रमी 1,578 एवढे मतदान मिळाले आहे.

या विजयानंतर सौ.रुपाली अमोल सस्ते यांचे ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर,आमदार सचिन पाटील,नवनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, ॲड. सौ.जिजामाला नाईक निंबाळकर,युवा नेते अभिजीत नाईक निंबाळकर, जयकुमार शिंदे, नातेवाईक, मित्रपरिवार यांनी त्यांचे अभिनंदन केले.

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

22
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

error: Content is protected !!