टाकळवाडे गावातील दोन पारंपरिक गट एकत्र! करत आहेत शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार   शिवसेनेचे तालुकाध्यक्ष नानासाहेब (पिंटू)इवरे व राजे गटाचे निष्ठावंत माजी सरपंच राहुल इवरे यांचा गावात जोरदार प्रचार शिवसेना उमेदवारांना गावातून मतदान वाढवून जाणार 


टाकळवाडे गावातील दोन पारंपरिक गट एकत्र! करत आहेत शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार

 

शिवसेनेचे तालुकाध्यक्ष नानासाहेब (पिंटू)इवरे व राजे गटाचे निष्ठावंत माजी सरपंच राहुल इवरे यांचा गावात जोरदार प्रचार

 

शिवसेना उमेदवारांना गावातून मतदान वाढवून जाणार

 

फलटण: टाकळवाडे गावामध्ये शिवसेनेचे तालुकाध्यक्ष पिंटू इवरे यांचा गट कार्यरत आहे.तर दुसरा गट राजे गट हा मा.सरपंच राहुल इवरे यांचे नेतृत्वाखाली गावात कार्यरत आहे.

 

गावात राजे गटाच्या माध्यमातून करोडो रुपयांची विकास कामे झालेली असून त्या विकास कामाच्या जोरावर राहुल इवरे हे शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार प्रसार करत आहेत.

 

तर शिवसेनेचे तालुकाध्यक्ष पिंटू इवरे यांनी ही गावात पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद विकास निधीतून विविध लोकोपयोगी कामे गावात केलेली आहेत.या मुद्द्यांवर त्यांचा गट हा शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करत आहे.

दोघांचाही पंचक्रोशीत जनसंपर्क मोठा असून सांगवी पंचायत समिती गणातील उमेदवार सौ.पुष्पा चोपडे यांना ते फायद्याचा ठरणार आहे.

एकंदरीतच दोघांची ताकद एकत्र झाल्यामुळे शिवसेनेच्या जिल्हा परिषदेचे उमेदवार सौ.ज्योती मोरे व सांगवी पंचायत समिती गणाचे उमेदवार सौ. पुष्पा चोपडे यांना गावातून मताधिक्य मिळणार असल्याचे चित्र दिसत आहे.


पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

28
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मरणार्थ एक लाख वह्यांच्या वाटपाचा संकल्प प्रेरणादायी : मुख्याध्यापक सुपुत्र बंडी आढाव सरांच्या जयंती निमित्त कुटुंबिकांकडून त्यांच्या विचारांचे कृतिशील आचरण!

error: Content is protected !!