सोमंथळी येथे अंगणवाड्यातील बालकांच्या विकासासाठी गंमत-जंमत सप्ताहाची सुरुवात! फलटण पंचायत समितीच्या एकात्मिक बाल विकास योजना प्रकल्पचा उपक्रम


सोमंथळी येथे अंगणवाड्यातील बालकांच्या विकासासाठी गंमत-जंमत सप्ताहाची सुरुवात!

 

फलटण पंचायत समितीच्या एकात्मिक बाल विकास योजना प्रकल्पचा उपक्रम

 

फलटण: अंगणवाड्यांमधील बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प फलटण मार्फत दि. १ ते ६ जुलै या कालावधीत ‘गंमत -जंमत सप्ताह’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सदर कार्यक्रमाचे उद्घाटन सोमंथळी येथे करण्यात आले..

 

या सप्ताहामध्ये बालकांची सृजनशीलता, कलागुण, बौद्धिक क्षमता व सामाजिक सहभाग वाढीस लागणे व पटसंख्या वाढविण्यासाठी या उद्देशाने मनोरंजक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ठसेकाम, माती काम व बडबडगीत सादरीकरण दि. १ जुलै रोजी, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, हाबभाव गीते व वेशभूषा सादरीकरण दि. २ जुलै रोजी, एकाग्रता वाढविणारे खेळ, इंडोअर गेम्स, बकेट बॉल व विविध मनोरंजनात्मक खेळ दि. ३ जुलै रोजी, संगित खेळी व क्लास मनोरे उपक्रम दि. ४ जुलै रोजी, पालक दिनानिमित्त दि. ५ जुलै रोजी पालकांसाठी विविध खेळ व डबा पार्टी, बालक-पालक सहभाग आणि दि. ६ जुलै रोजी बक्षीस वितरण, आनंद मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत..

या उपक्रमामुळे बालकांमध्ये आनंदी वातावरणात शिक्षणाची गोडी निर्माण होण्यास मदत होणार असून…

पालकांचा सहभाग वाढण्यासाठी चालना मिळणार आहे. अंगणवाड्यांमध्ये पटसंख्या वाढीसाठी या सप्ताहातील विविध उपक्रमांचा नक्कीच हातभार लागेल..

 

सोमंथळी येथील कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी जि प सदस्या वैशालीताई कांबळे, जि प सदस्या ज्योती मोरे, पंचायत समिती सदस्य श्री. राहुल नरुटे, पंचायत समिती सदस्य श्री.संतोष कारंडे, पंचायत समिती सदस्य श्री. गणेश तांबे, पंचायत समिती सदस्य श्री सचिन अभंग, सोमंथळी सरपंच श्री सचिन सोडमिसे, महिला बाल विकास अधिकारी कु.प्रियांका हरिश्चंद्र गवळी , एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प सर्व पर्यवेक्षिका उपस्थित होत्या..

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमल फुले मॅडम यांनी केले..

 

सदर सप्ताह फलटण तालुक्यातील सर्व अंगणवाड्यांमध्ये राबवण्यात येणार आहे.


मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

35
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

error: Content is protected !!