सत्याचा आसुड” शेतकऱ्यांच्या वेदनेचे व संघर्षाचे बीज: डॉ. वसंत काटे(प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट अमेरिका)   ग्रामीण साहित्यिक सुरेश शिंदे लिखित ‘ सत्याचा आसूड’ या कादंबरीचे प्रकाशन

“सत्याचा आसुड” शेतकऱ्यांच्या वेदनेचे व संघर्षाचे बीज: डॉ. वसंत काटे(प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट अमेरिका)

ग्रामीण साहित्यिक सुरेश शिंदे लिखित ‘ सत्याचा आसूड’ या कादंबरीचे प्रकाशन

फलटण प्रतिनिधी : ग्रामीण भागातील माणसांच्या व्यथा, वेदना, भावभावना, सुखदुःख, याचं प्रकटीकरण होत राहिलं होतं, शहरी जीवनापेक्षा ग्रामीण जीवन निराळ आहे, वेगळं आहे, त्यांच्या समस्या वेगळ्या आहेत, ग्रामीण जीवनाचा कर्ता, करविता जो शेतकरी आहे, त्याचे बदलत्या परिस्थितीनुसार कसे हाल होत आहेत, शेती करून, पिकवून इतरांना धनधान्य मिळवून देणारा शेतकरी, स्वतःच कसा उपाशी मरतो आहे, अगदी आत्महत्या करण्याची त्याच्यावर वेळ येते असे चिंतन “सत्याचा आसूड ” या कादंबरीचे प्रकाशन करताना अमेरिका येथील प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉ वसंत काटे यांनी केले.

यावेळी फलटण साहित्य परिषदेच्या शाखेचे कार्याध्यक्ष महादेव गुंजवटे ,लेखक सुरेश शिंदे , प्रा विजय खुडे , भरत सुरसे , साहित्यिक रविंद्र वेदपाठक यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना डॉ.काटे पुढे म्हणाले की अनियमित पाऊस, अतिवृष्टी, अनियमित हवामानातील बदल, शेतीसाठी लागणारी कीटकनाशके, बी बियाणे, यांची उपलब्धता आणि खर्च, तसेच पिकांना योग्य भाव न मिळणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा बाजारपेठेचा अभाव, बाजारात माल पोहोचवण्याची अडचण, इत्यादी अनेक प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारा, ग्रामीण साहित्यिक सुरेश शिंदे फलटण यांनी केलेले वर्णन ‘सत्याचा आसूड’ मधून वेदना देऊन जाते.

अध्यक्षीय भाषणात महाराष्ट्र साहित्य परिषद, फलटण शाखेचे कार्याध्यक्ष महादेव गुंजवटे यांनी अत्यंत सुरेख शब्दात योग्य मांडणी करून सुरेश शिंदे यांच्या दिवंगत पत्नी सुलेखा शिंदे यांच्या साळवणाची खोप, मालकाचं खातं, लेखकाचं घर पेलताना, इत्यादी अनेक कादंबरींवर प्रकाश झोत टाकला, “सत्याचा आसूड” या कादंबरीत शेतकऱ्यांच्या खऱ्याखुऱ्या समस्यांचा मागोवा सुरेश शिंदे यांनी घेतला असल्याचे स्पष्ट केले, या कादंबरीचे डॉ. काटे सर यांनी इंग्रजी अनुवाद करून ती प्रकाशित करावे देश विदेशातील अनेकांना याचा फायदा होईल, असे मत व्यक्त केले.

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

22
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

error: Content is protected !!