पंचायत समिती सांगवी गणातून भाजपच्या तृप्ती विक्रम सुतार यांच्या नावाची जोरदार चर्चा


पंचायत समिती सांगवी गणातून

भाजपच्या तृप्ती विक्रम सुतार यांच्या नावाची जोरदार चर्चा.

 

फलटण प्रतिनिधी: आगामी काही दिवसावर येऊन राहिलेल्या पंचायत समिती फलटणच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी पंचायत समिती सांगवी गणातून भारतीय जनता पार्टीच्या एक उच्चशिक्षित महिला म्हणून सौ.तृप्ती विक्रम सुतार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.

 

तृप्ती सुतार या युवा उद्योजक विक्रम सुतार यांच्या पत्नी असून, राजाळे गावचे माजी सरपंच श्री.मोहन सुतार यांच्या त्या सुनबाई आहेत. मोहन सुतार यांनी 28/ 08/2000 ते 25/08/2005 असे पाच वर्षासाठी सरपंच पद भूषवले आहे.गावातील जेष्ठ नेते श्री.संभाजीबापू निंबाळकर यांचा गट व माजी सनदी अधिकारी श्री.विश्वासराव भोसले यांचा गट यांनी एकत्रित बिनविरोध भूमिकेमुळे त्यांना सरपंचपदी गावाने बिनविरोध केले.या कार्यकाळात त्यांनी गावात विविध सामाजिक उपक्रम राबवून सर्वांना बरोबर घेऊन गावचा विकास केला.

 

पंचायत समिती सांगवी गणामध्ये, राजाळे,टाकळवाडे,सोनगाव,सांगवी व सोमंथळी ही गावे येतात.सांगवी गण हा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (OBC) साठी आरक्षित आहे.तर विडणी गणामध्ये विडणी,धुळदेव, माझेरी, पिंप्रद ही गावे येतात. विडणी गण हा सर्वसाधारण खुला प्रवर्गासाठी आरक्षित आहे. दोन्ही गणांचा मिळून जिल्हा परिषद साठी विडणी गट तयार झालेला असून.विडणी जिल्हा परिषद गट हा अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव आहे.

 

भारतीय जनता पार्टी कडून विडणी जिल्हा परिषद गटासाठी सांगवी गावला तिकीट मिळू शकते. व त्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी ज्येष्ठ नेते हनुमंतराव मोहिते यांच्या खांद्यावर पडण्याची शक्यता आहे. तर पंचायत समिती विडणी गणासाठी विडणी गावातीलच व्यक्ती उमेदवार म्हणून उभा केला जाऊ शकतो. व त्याला निवडून आणण्याची जबाबदारी ही विडणीचे सरपंच सागर अभंग यांच्या खांद्यावर पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे सांगवी गणासाठी राजाळे गावला तिकीट मिळू शकते. व सांगवी गणातील उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी ही राजाळे गावचे सुपुत्र माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांच्या खांद्यावर पडण्याची शक्यता आहे.

या एकंदरित अंदाजावरून सांगवी गणासाठी श्री. विश्वासराव भोसले यांचे निष्ठावंत मावळे माजी सरपंच श्री.मोहन सुतार यांच्या सुनबाई सौ. तृप्ती विक्रम सुतार यांना संधी मिळू शकते.त्यांच्या नावाची चर्चा ही पंचक्रोशीत सुरू असून. त्यांना उमेदवारी मिळाल्यास, एका बहुजन- अल्पसंख्यांक समाजातील उच्चशिक्षित महिलेला राजकीय क्षेत्रात काम करण्याची संधी मिळू शकते.


मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

35
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

मजुरांना काम द्या, मस्टर उपलब्ध करा! दुष्काळात रोजगारासाठी जि.प. सदस्या सौ.वैशाली कांबळे आक्रमक बरड गटातील गावांमध्ये मनरेगाची कामे तातडीने सुरू करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

error: Content is protected !!